शेतकऱ्यांनी घातला महावितरणला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:39 AM2021-03-09T04:39:32+5:302021-03-09T04:39:32+5:30

कुरुड : वडसा तालुक्यातील बोळधा, कोरेगाव, चोप परिसरातील शेतकऱ्याच्या कृषिपंपाचा विद्युतपुरवठा दिवसा वारंवार खंडित होत होता. दिवसातून फक्त एक ...

Farmers laid siege to MSEDCL | शेतकऱ्यांनी घातला महावितरणला घेराव

शेतकऱ्यांनी घातला महावितरणला घेराव

Next

कुरुड : वडसा तालुक्यातील बोळधा, कोरेगाव, चोप परिसरातील शेतकऱ्याच्या कृषिपंपाचा विद्युतपुरवठा दिवसा वारंवार खंडित होत होता. दिवसातून फक्त एक ते दोन तास विद्युतपुरवठा सुरू राहात होता. त्यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले होते. वारंवार निवेदन देऊनसुद्धा महावितरणने लक्ष दिले नाही, त्यामुळे हातात आलेले पीक मरते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांच्या नेतृत्वात महावितरण कायार्लयावर धडक देण्यात आली. विद्युत विभागाचे अधिकारी साळवे व सामृतवार यांना घेराव करण्यात आला.

विद्युत पुरवठा वारंवार का खंडित होते, याचा जाब विचारण्यात आला. विद्युत पुरवठा आताच्या आत्ता सुरळीत झाला पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. त्या वेळेस उपविभागीय अभियंता साळवे यांनी म्हटले की, कोरेगाव, बोळधा, चोप व पोटगाव येथील विद्युत पुरवठा एकाच फीडरमधून आहे, तर पोटगावचा पुरवठा वेगळा करून कोरेगाव, बोळधा चोपच्या एकाच फीडरवर करू, त्यामुळे तेवढा लोड कमी होईल व वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, असे सुचविण्यात आले. येत्या चार - पाच दिवसात काम होईल असे सांगितले. तोपर्यंत दिवसा सतत तीन तास वीज सुरू राहील. तीन तास बंद राहील. सायंकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहील, असे सांगितले. त्यामुळे चिंताग्रस्त झालेले शेतकरी समाधानी झाले. घेराव एक तासपर्यंत घालण्यात आला. परत विद्युतपुरवठा खंडित झाल्यास तीव्र आंदोलन, चक्का जाम तसेच कार्यालयाला ताला ठोकू, असा इशारा देण्यात आला. घेराव आंदोलनात माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल, उपजिल्हाप्रमुख भरत जोशी, माजी उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, डॉ. अनिल उईके, महादेवजी गायकवाड आदी हजर हाेते.

Web Title: Farmers laid siege to MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.