शेतकऱ्यांनी जाणले कृषी तंत्रज्ञान
By admin | Published: February 29, 2016 01:03 AM2016-02-29T01:03:53+5:302016-02-29T01:03:53+5:30
कृषी विज्ञान केंद्र सोनापूर, आत्मा व महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने धान काढणी ...
मार्गदर्शन : धान काढणी पश्चात तंत्रज्ञानावर प्रशिक्षण
गडचिरोली : कृषी विज्ञान केंद्र सोनापूर, आत्मा व महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने धान काढणी पश्चात तंत्रज्ञानावर तीन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणातून शेतकऱ्यांनी कृषी तंत्रज्ञान जाणून घेतले. या प्रशिक्षणाचा समारोप रविवारी करण्यात आला.
प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्र सोनापूरचे डॉ. एस. पी. लांबे, डॉ. एस. एल. बोरकर, डी. एन. अनोकार, विजय अरगडे व गृहविज्ञान विषय विशेषज्ञ प्रा. योगिता सानप आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. लांबे यांनी उद्योजकता विकास कौशल्य व उद्योग उभारणीतील विविध टप्पे या विषयावर माहिती दिली. डॉ. श्रीकांत ब्राह्मणकर यांनी धान पिकावरील रोगाच्या प्रादुर्भावाबाबत मार्गदर्शन केले. डॉ. बोरकर यांनी धान पिकावरील कीड, रोग व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले. अनोकार यांनी धान लागवड तंत्रज्ञान तर डॉ. कांबळी यांनी भात पिकाच्या प्रक्रियेतील विविध वाणाबाबत माहिती दिली. (स्थानिक प्रतिनिधी)