पावसाच्या हुलकावणीने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:39 AM2021-08-26T04:39:10+5:302021-08-26T04:39:10+5:30
पावसाचे मघा नक्षत्र १६ ऑगस्टपासून सुरू झाले व पहिले चरण होऊनही अपेक्षित पाऊस येत नसल्याने शेतकरी चिंतित दिवस काढत ...
पावसाचे मघा नक्षत्र १६ ऑगस्टपासून सुरू झाले व पहिले चरण होऊनही अपेक्षित पाऊस येत नसल्याने शेतकरी चिंतित दिवस काढत आहेत.
दररोज सकाळी, दुपारी, संध्याकाळी आकाशात ढगाळ वातावरण निर्माण होते. पावसाचे शिंतोडे पडतात. हलक्या स्वरूपाचा पाऊस येऊन निघून जातो आता तरी पाऊस पडेल, अशी अपेक्षा पल्लवित होतानाच पाऊस दगा देऊन निघून जातो. जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्याला आहे .
आज पाऊस नाही आला तरी उद्या नक्की पडेल या अपेक्षेने शेतकरी आपल्या घरी शेतातून परत येत असतो. तालुक्यांत वरच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना अधिकची चिंता आहे. पुन्हा पाऊस आला तर उद्याला शेतातील कामे कुठून सुरू करायची याचे नियोजन करू लागतो. हा उपक्रम मागील काही दिवसांपासून तालुक्यात पहावयास मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात बोरवेल, विहीर, तलाव, नहर व नाल्याच्या पाण्याची सोय आहे त्या शेतकऱ्यांच्या रोवणीसाठी पाण्याची सोय होत आहे तर वर थेंबी पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना आणखी किती दिवस दमदार पावसाची वाट पहावी लागेल हे सांगणे कठीण आहे.
250821\img_20210825_122255.jpg
धान पट्ट्यात पावसाची हुलकावणी शेतकरी चिंतातुर रोवणी झालेल्या धानाचे फोटो