संपापासून शेतकरी लांबच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2017 01:00 AM2017-06-02T01:00:06+5:302017-06-02T01:00:06+5:30

राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी प्रथमच संपात उतरलेल्या शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची

Farmer's long break from the collapse | संपापासून शेतकरी लांबच

संपापासून शेतकरी लांबच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी प्रथमच संपात उतरलेल्या शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची धग गडचिरोली जिल्ह्यापर्यंत पोहोचलीच नाही. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही या आंदोलनात शेतकरी सहभागी झाल्याचे चित्र गुरूवारी दिसले नाही.
शेतकऱ्यांचा हा संप कसा करायचा, या आंदोलनाचे नेमके स्वरूप काय, ते कुठे करायचे अशा अनेक प्रश्नांचे उत्तर कोणत्याच शेतकऱ्याकडे नसल्यामुळे कोणी या संपात उतरले नाही. अनेक शेतकऱ्यांना तर मुंबई किंवा पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या या संपाची माहितीसुद्धा नसल्याचे लोकमतने केलेल्या पाहणीत दिसून आले.
जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी आणि सिरोंचा या चार मुख्य कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यवहारावरही कोणताच परिणाम झालेला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांकडून भाजीपाला किंवा इतर शेतमाल मिळाला नाही म्हणून नागरिकांना त्याची झळ पोहोचल्याचे वातावरण दिसून आले नाही. या आंदोलनासाठी नेतृत्व करणारा नेता शेतकऱ्यांकडे नाही.

Web Title: Farmer's long break from the collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.