नैनपूरच्या शेतकऱ्यांची सेंद्रिय शेतीकडून व्यवसायाकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:38 AM2021-09-11T04:38:07+5:302021-09-11T04:38:07+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीआरपीएफचे डीवायएसपी डी. एस. जांभूळकर होते. शेतकरी, युवक व विद्यार्थ्यांनी व्यसनाच्या मागे न लागता एकत्रित येऊन ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीआरपीएफचे डीवायएसपी डी. एस. जांभूळकर होते. शेतकरी, युवक व विद्यार्थ्यांनी व्यसनाच्या मागे न लागता एकत्रित येऊन सेंद्रिय शेती करावी. तालुक्यातील शेतकऱ्यांनी नैनपूरच्या उत्पादक कंपनीचा आदर्श घ्यावा, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी नीलेश गेडाम, पुष्पक बोथीकर, पोलीस कल्याण अधिकारी पवण मिश्रा आदी उपस्थित होते. यावेळी सेंद्रिय शेतकरी गटाने तयार केलेले सेंद्रिय खताचे वाटप करण्यात आले. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकरिता गटामार्फत सेंद्रिय खत तयार करून देण्यात येईल, असे भाग्यलक्ष्मी शेतकरी गटाचे अध्यक्ष गजेंद्र ठाकरे यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमात गांडूळ खतनिर्मिती, जीवामृत दशपर्णी अर्क तयार करण्यात आले.
सेंद्रिय शेती काळाची गरज असून, शेतीमधील अतिरिक्त खर्च कमी करण्याचे उपाय तालुका कृषी अधिकारी नीलेश गेडाम यांनी शेतकऱ्यांना सांगितले. प्रास्ताविक तालुका तंत्रव्यवस्थापक (आत्मा) महेंद्र दोनाडकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन कृषी सहायक कल्पना ठाकरे यांनी केले. आभार मंगेश तुपट यांनी मानले.