शेतकऱ्यांचे धान चुकारे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:09 AM2021-03-04T05:09:58+5:302021-03-04T05:09:58+5:30

धानोरा तालुक्यात आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत आदिवासी विकास सोसायट्यांमार्फत दहा केंद्रावर धान खरेदी केली जाते. यामध्ये सोडे, चातगाव, पेंढारी, ...

Farmers' paddy errors pending | शेतकऱ्यांचे धान चुकारे प्रलंबित

शेतकऱ्यांचे धान चुकारे प्रलंबित

Next

धानोरा तालुक्यात आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत आदिवासी विकास सोसायट्यांमार्फत दहा केंद्रावर धान खरेदी केली जाते. यामध्ये सोडे, चातगाव, पेंढारी, गट्टा, मोहगाव, धानोरा, मुरुमगाव, रांगी, दुधमाळा, कारवाफा, मोहली या केंद्रांचा समावेश आहे. सदर केंद्रावर डिसेंंबरपासून धान खरेदी सुरू झाली. यामध्ये २ मार्चपर्यंत धानोरा केंद्रावर ७४५८.३७ क्विंटल, मुरूमगाव केंद्रावर २३६४४.८०, रांगी १२८७४.८४, दुधमाळा ८२२५.४०, कारवाफा १०५१५.५०, मोहली १२२६६.८०, सोडे ९६४८.१९, चातगाव ८५७८.४६, येरकड ७३५३.२६, सावरगाव ५२२९.६०, पेंढरी ४८३५.७२,गट्टा ११७४.८०, मोहगाव ३५७.८० अशी एकूण ११०१६३.४८ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. त्यापैकी ६५५४६.६१ क्विंटल धानाची हुंडी जिल्हा कार्यालयात सादर करण्यात आली आहे. ४४२५९.०७ क्विंटल धानाची हुंडी सादर करणे बाकी आहे. यापैकी सुरुवातीला सादर केलेल्या एक ते दोन हुंडींचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. परंतु अनेक शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे दोन महिन्यांपासून त्यांच्या खात्यात जमा न झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या घरचे लग्न, कार्यक्रम, घर बांधणे, मजुरांचे देणे, सावकाराचे कर्ज, बँकेचे कर्ज थकीत पडले आहे. आधीच शेतकऱ्यांना धानाचा योग्य मोबदला मिळत नाही. धानावर अनेक रोगांचे आक्रमण अशा परिस्थितीत निसर्गाशी झगडून न खचता शेतकरी धान पिकवतो. आपले आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याकरिता ते आपले धान आधारभूत खरेदी केंद्रावर विक्री करतात. परंतु विक्री केलेल्या धानाचे दोन महिने उलटूनही चुकारे न मिळाल्याने शेतकरी खचून गेले आहेत. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन चुकारे लवकरात लवकर मिळवून द्यावेत, अशी मागणी होत आहे.

Web Title: Farmers' paddy errors pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.