लॉकडाऊनमध्ये कळले शेतकऱ्याचे मोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 05:00 AM2020-04-19T05:00:00+5:302020-04-19T05:00:45+5:30
दोन वेळचे जेवन मिळावे, यासाठी मजूरवर्ग दिवसभर काम करते. तर हे अन्न तयार करण्यासाठी शेतकरी स्वत:ला वाहून घेते. मात्र बदलत्या अर्थव्यवस्थेत शेतकरी अडचणीत आला आहे. दिवसभर शेतीत राबल्यानंतर त्यालाच दोनवेळचे अन्न मिळणे कठीण झाले आहे. मात्र आजपर्यंतच्या सरकारांनी याकडे फारसे लक्ष न दिल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळत गेली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. यामध्ये बहुतांश कारखाण्यांना कुलूप ठोकण्यात आले आहेत. तर बुहतांश सेवा बंद केल्या आहेत. मात्र यातून शेतकरी वर्गाला वगळण्यात आले आहे. अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरवठा नियमित सुरू राहील याकडे प्रशासन विशेष लक्ष देऊन आहे. यावरून जनतेला शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल तसेच त्यांनी पिकविलेला माल जीवन जगण्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे कळायला लागले आहे.
दोन वेळचे जेवन मिळावे, यासाठी मजूरवर्ग दिवसभर काम करते. तर हे अन्न तयार करण्यासाठी शेतकरी स्वत:ला वाहून घेते. मात्र बदलत्या अर्थव्यवस्थेत शेतकरी अडचणीत आला आहे. दिवसभर शेतीत राबल्यानंतर त्यालाच दोनवेळचे अन्न मिळणे कठीण झाले आहे. मात्र आजपर्यंतच्या सरकारांनी याकडे फारसे लक्ष न दिल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळत गेली. तर चैनीच्या वस्तूंचे उत्पादन करणारे कंपन्यांचे मालक गब्बर बनले. कोरोनाने मात्र जनतेला मूलभूत गरजांची आठवण करून दिली आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्याला आता जवळपास २५ दिवसांचा कालावधी उलटत चालला आहे. यामध्ये चैनीच्या वस्तूंची सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र भाजीपाला व अन्नधान्याचा पुरवठा नियमित सुरू राहिल, याकडे लक्ष दिले जात आहे. यावरून नागरिकांना आता शेतीचे महत्त्व कळायला लागले आहे. इतर सर्व उद्योग बुडले तरी शेती पिकणे असणे आवश्यक आहे. सरकारनेही शेतकºयांच्या विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
जगाच्या पोशिंद्याचे महत्त्व नागरिकांना आता कळायला लागले आहे. मात्र याच पोशिंद्याला पेट्रोल मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. कर्मचाºयाला कार्ड दाखविल्याबरोबर तो म्हणेल तेवढे पेट्रोल दिले जात आहे. शेतकºयाला मात्र १०० रुपयांच्या वर दिले जात नाही. दुसºया गावावरून भाजीपाला आणताना अडचण होत आहे.
अनेकांनी सुरू केली भाजी विक्री
लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे शहरात मजुरी करण्यासाठी गेलेले नागरिक आता गावाला परतायला लागले आहेत. कंपन्या सुध्दा अनेकांना डच्चू देण्याची शक्यता आहे. शेतकºयावर मात्र लॉकडाऊनचा फारसा परिणाम पडला नाही. भाजीपाला, धान्याची विक्री सुरूच आहे. तसेच शेतीची कामेही सुरू आहेत. बेरोजगार झालेला वर्ग आता पुन्हा शेतीकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही.