कामाशिवाय परतले शेतकरी

By admin | Published: July 21, 2016 01:31 AM2016-07-21T01:31:00+5:302016-07-21T01:31:00+5:30

शैक्षणिक सत्राची सुरूवात झाली असल्याने तसेच शेतकरी पीक कर्ज, पुनर्गठित कर्ज प्रकरणे, शैक्षणिक दाखले व शेतीविषयक दाखले

Farmers Returned to Work | कामाशिवाय परतले शेतकरी

कामाशिवाय परतले शेतकरी

Next

पोटगावचे तलाठी कार्यालय बंद : कार्यालयात उपस्थित राहण्याचे दिवस ठरवून देण्याची मागणी
देसाईगंज : शैक्षणिक सत्राची सुरूवात झाली असल्याने तसेच शेतकरी पीक कर्ज, पुनर्गठित कर्ज प्रकरणे, शैक्षणिक दाखले व शेतीविषयक दाखले मिळविण्यासाठी शेतकरी व नागरिक तलाठी कार्यालयात दाखल होत आहेत. परंतु साजामध्ये तलाठी हजर राहत नाही. व त्यांचा ठावठिकाणाही दाखल्यांसाठी आलेल्या नागरिकांना लागत नाही. असाच काहीसा प्रकार तालुक्याच्या पोटगाव येथे मंगळवार १९ जुलै रोजी घडला. विविध दाखल्यांसाठी आलेल्या नागरिकांना तलाठी कार्यालय बंद असल्यामुळे गावाकडे परतावे लागले.
सध्या महसूल विभागाने शेतकऱ्यांना मिळणारी कागदपत्रे संगणकीकृत करण्यासाठी आजतागायत सर्वच तलाठ्यांना कामाला लावून ती करवून घेतली व होतही आहेत. त्यामुळे तलाठ्यांची स्थिती ‘तळ्यात, मळ्यात’ अशी होती. परंतु तलाठी साजात हजर राहत नाही व तहसील कार्यालयातही दिसून येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दाखल्यांसाठी वणवण भटकावे लागते.
पोटगाव येथे मंगळवारी कामानिमित्त आलेल्या शेतकऱ्यांना तलाठी कार्यालय बंद दिसल्यामुळे रिकाम्या हातानेच स्वगावी परतावे लागले. महिन्यातील बरेच दिवस तलाठी कार्यालय बंद असते. येथील नेमके कामाचे स्वरूप कोणालाच माहित नाही. त्यामुळे अनेकांना काम न होताच खाली हाताने परतावे लागते, असे एका इसमाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

तलाठी सुटीवर की कर्तव्यावर?
पोटगावसह इतरही तलाठी कार्यालयात तलाठी उपस्थित राहत नाही. त्यांना शोधण्याचा प्रयत्न केल्यास ते तहसील कार्यालयातही आढळून येत नाही. त्यामुळे तलाठी सुटीवर की कर्तव्यावर असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडतो. संबंधित कर्मचारी हजर नसताना नोटीस बोर्डवर अशा सूचना लावणे गरजेचे असते. परंतु सूचना लावल्या जात नाही. तलाठ्यासह कोतवालही कार्यालयात हजर राहत नसल्याने विविध कामासाठी लागणारे दाखले तहसील कार्यालयात संगणकीय कामकाजाचे दिवस, साजात उपस्थित राहण्याचे दिवस ठरवून द्यावे, अशा सूचना नोटीस बोर्डवर लिहाव्या, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.

 

Web Title: Farmers Returned to Work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.