शेतकऱ्यांनी बोगस कापूस बियाणांपासून सावध राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:37 AM2021-05-13T04:37:00+5:302021-05-13T04:37:00+5:30

हर्षा क्रॉप सायन्स, राऊंड अप बिटी, एचटीबीटी, विड गार्ड, सूर्या या नावाने कंपन्या कापसाचे बोगस बियाणे तयार करीत आहेत. ...

Farmers should beware of bogus cotton seeds | शेतकऱ्यांनी बोगस कापूस बियाणांपासून सावध राहावे

शेतकऱ्यांनी बोगस कापूस बियाणांपासून सावध राहावे

Next

हर्षा क्रॉप सायन्स, राऊंड अप बिटी, एचटीबीटी, विड गार्ड, सूर्या या नावाने कंपन्या कापसाचे बोगस बियाणे तयार करीत आहेत. सदर कंपन्यांना शासनाची कोणतीही परवानगी नाही. सदर बियाणांमुळे व तणनाशकांचा वापर यामुळे जमिनीचा पोत खालावताे, तसेच मानवाला दुर्धर आजार हाेण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनी काेणत्याही आश्वासनाला बळी पडू नये, तसेच शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्याकडून बियाणे खरेदी करावे. खरेदी करताना पक्की पावती घ्यावी. खरेदीची पावती व पाकिटातील थोडे बियाणे कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. बोगस बियाणांच्या काही तक्रारी असल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गडचिरोली, कृषी विकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा. केंद्रातील बियाणे, खते यांची तपासणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पथक तयार केले आहे. या पथकाकडेही तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे. मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी खरीप हंगामात अनधिकृत बियाणे विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत तालुका कृषी अधिकारी दीपक कांबळे यांनी दिले आहेत.

Web Title: Farmers should beware of bogus cotton seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.