शेतकऱ्यांनी पट्टा पद्धतीने धानाची राेवणी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:34 AM2021-08-01T04:34:05+5:302021-08-01T04:34:05+5:30
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने शेतीच्या बांधावर भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. याअंतर्गत तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतीच्या ...
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने शेतीच्या बांधावर भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. याअंतर्गत तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतीच्या बांधाला भेट देऊन पट्टा पद्धतीविषयी माहिती दिली. राेवणी नंतर एक ते दीड महिन्यात तुडतुड्यासारख्या किडीचा प्रादुर्भाव वाढताे . पट्टा पद्धतीमुळे किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यात मदत होते. तसेच पिकांची आंतरमशागत, खत देणे, फवारणी करणे, पिकांचे निरीक्षण करणे सोयीचे होते.
त्याचप्रमाणे शासनाच्या धोरणानुसार रासायनिक खताची दहा टक्के बचत करण्यासाठी तालुक्यात कृषी विभागामार्फत मोठ्या प्रमाणात ॲझोला युनिट तयार करण्यात आलेले असून याचा वापर धान शेतीत रोवणीच्या वेळी केल्याने पिकाला लागणाऱ्या नत्राची गरज पूर्ण हाेते. तसेच रासायनिक खताचा वापर कमी करण्यास मदत होते. कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांना ॲझाेला कल्चरची आवश्यकता असल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा,असे आवाहन तालुका कृषी अधिकारी विद्या मांडलिक यांनी केली.