शेतकऱ्यांनी बांबू शेती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 01:46 AM2018-06-27T01:46:43+5:302018-06-27T01:48:26+5:30

सध्यास्थितीत धानाच्या शेतीला पर्यायी शेती म्हणून बांबू शेतीचा स्विकार शेतकºयांनी केला पाहिजे, या शेतीसाठी लागणारे मार्गदर्शन व बांबू पिककर्ज जिल्हा बँकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येईल, याशिवाय पीक हाती आल्यानंतर उत्पादनाचे मार्केटिंग करण्यासाठी नामांकित संस्थेसोबत करारनामा केला जाईल.

Farmers should make bamboo farming | शेतकऱ्यांनी बांबू शेती करावी

शेतकऱ्यांनी बांबू शेती करावी

Next
ठळक मुद्देप्रंचित पोरेड्डीवार यांचे आवाहन : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे बांबूशेती प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सध्यास्थितीत धानाच्या शेतीला पर्यायी शेती म्हणून बांबू शेतीचा स्विकार शेतकºयांनी केला पाहिजे, या शेतीसाठी लागणारे मार्गदर्शन व बांबू पिककर्ज जिल्हा बँकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येईल, याशिवाय पीक हाती आल्यानंतर उत्पादनाचे मार्केटिंग करण्यासाठी नामांकित संस्थेसोबत करारनामा केला जाईल. हा शेतकऱ्यांना बंधनकारक राहणार नाही. गडचिरोली जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी बांबू शेतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी केले.
गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात बांबू शेती प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंंगी मंचावर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मार्गदर्शक म्हणून बांबूशेती तज्ज्ञ नितीन कावडकर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना नितीन कावडकर म्हणाले, बलकोवा प्रजातीचा बांबू अतिशय उच्च प्रतिचा असून गडचिरोली जिल्ह्याच्या हवामानात या पिकाचे उत्पादन चांगले होऊ शकते. तीन वर्षात त्याचे पहिले पीक येईल. पुढे बांबूच्या प्रजाती, हेक्टरी येणारा उत्पादन खर्च, शेतकऱ्यांना मिळणारा नफा, बांबू लागवडीची पद्धत आदी बाबत कावडकर यांनी सविस्तर माहिती दिली. सध्याच्या अनिश्चित पावसामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान होत आहे. त्याला पर्याय म्हणून शेतकºयांनी जर आपल्या शेतशिवारात बांबू लावले तर त्यापासून परवडेल, अशा प्रकारचे उत्पादन मिळू शकते. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बांबू शेतीकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, संचालन किरण सांबरे यांनी केले. कार्यक्रमाला मुख्य व्यवस्थापक अरूण निंबेकार यांच्यासह बँकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्ह्याच्या विविध भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यशाळेत गडचिरोली जिल्ह्यातील सध्यास्थितीत सुरू असलेल्या धान शेतीचे उत्पादन, लागवडीचा खर्च, शेतकऱ्यांना मिळणारा नफा, तोटा, धानाचे भाव आदीबाबींसह शेतकºयांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. अनेकांनी मनोगत व्यक्त केले.

Web Title: Farmers should make bamboo farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती