पीक स्पर्धेत शेतकऱ्यांनी भाग घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:41 AM2021-08-21T04:41:51+5:302021-08-21T04:41:51+5:30
पीक स्पर्धेत भाग घेण्याकरिता जमीन शेतकऱ्यांच्या नावावर असणे आवश्यक आहे. आदिवासी व सर्वसाधारण गटाकरिता प्रवेश शुल्क ३०० रुपये आहे. ...
पीक स्पर्धेत भाग घेण्याकरिता जमीन शेतकऱ्यांच्या नावावर असणे आवश्यक आहे. आदिवासी व सर्वसाधारण गटाकरिता प्रवेश शुल्क ३०० रुपये आहे. तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्यास ५ हजार रुपये, द्वितीय बक्षीस ३ हजार रुपये, तर तृतीय बक्षीस २ हजार रुपये दिले जाणार आहे. जिल्हापातळीवर प्रथम १० हजार, द्वितीय ७ हजार, तर तृतीय बक्षीस ५ हजार रुपये, विभाग पातळीवर पहिले बक्षीस २५ हजार, द्वितीय २० हजार, तृतीय बक्षीस १५ हजार तर राज्य पातळीवर पहिले बक्षीस ५० हजार, द्वितीय बक्षीस ४० हजार तर तृतीय बक्षीस ३० हजार रुपये दिले जाणार आहेत. तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत नाेंदणी करून स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन विद्या मांडलिक यांनी केले आहे.