रेशीम शेती शेतकरी सुलतानी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 05:27 PM2020-10-29T17:27:23+5:302020-10-29T17:28:01+5:30
Gadchiroli News farmer शासनाकडून मिळणारी सबसिडी या वर्षात 75 टक्के बंद केल्याने कोसा उत्पादकांना शंभर अंडीपुंज यासाठी बाराशे रुपये मोजावे लागत असल्याने यंदाची रेशीम शेती सुलतानी संकटात सापडली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: रेशीम शेती उद्योगाला संपूर्ण विदर्भात भरपूर प्रमाणात वाव असून रेशीम शेती करता या वर्षात हवामान पोषक आहे पण 100 अंडीपुंज यासाठी शासनाकडून मिळणारी सबसिडी या वर्षात 75 टक्के बंद केल्याने कोसा उत्पादकांना शंभर अंडीपुंज यासाठी बाराशे रुपये मोजावे लागत असल्याने यंदाची रेशीम शेती सुलतानी संकटात सापडली आहे.
विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया या चार जिल्ह्यात जंगलातील येनअर्जुन वृक्षावर तसेच रेशीम शेती उद्योगाला प्रचंड वाव आहेत पूर्व विदभार्तील अभी धीवरसमाजबांधव रेशीम शेती परंपरागत रित्या मोठ्या प्रमाणात करीत असून हजारो कुटुंब यावर उदरनिर्वाह करीत आहेत मागच्या वर्षात रेशीम शेती उत्पादकाला शंभर अंडीपुंज विकत घेण्यासाठी तीनशे रुपये भरावे लागत असे या वर्षात शंभर आणि पुन्हा विकत घेण्यासाठी बाराशे रुपये मोजावे लागत आहे सवलतीच्या दरात तुती बेणे व अंडीपुंज याचा पुरवठा होत नसल्याने रेशीम शेती उत्पादकाचे अजून पर्यंत अंडीपुंज खरेदी केली नसल्याची माहिती आहे.
जिल्हा रेशीम कार्यालय दरवर्षी एप्रिल ते जून मध्ये सुट्टी लागवडीकरीता इच्छुक शेतकऱ्यांची नोंद करून सवलतीच्या दरात अंडीपुंज उपलब्ध करून देतात पण या वर्षात सिरोंचा तालुक्यातील चीनूर येथून कुरखेडा तालुक्यातील क ढोली येथील शेतकऱ्यांनी रेशीम शेती करण्यासाठी 1लाख 84 हजार रुपयाचे अंडीपुंज खरेदी करण्यात आले अशी माहिती रेशीम शेती उत्पादक एकनाथ सोनवणे यांनी दिली.