घाटीतील शेतकऱ्यांची तहसील व विद्युत कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:45 AM2021-07-07T04:45:46+5:302021-07-07T04:45:46+5:30

यावर्षी खरीप हंगामाला सुरुवात झाली असली तरी जाेरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे मोटार पंपाच्या सहाय्याने धानरोवणी हंगाम करण्याचा खटाटोप ...

Farmers in the valley hit the tehsil and electricity office | घाटीतील शेतकऱ्यांची तहसील व विद्युत कार्यालयावर धडक

घाटीतील शेतकऱ्यांची तहसील व विद्युत कार्यालयावर धडक

Next

यावर्षी खरीप हंगामाला सुरुवात झाली असली तरी जाेरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे मोटार पंपाच्या सहाय्याने धानरोवणी हंगाम करण्याचा खटाटोप शेतकरी करीत आहेत. मात्र, ऐन हंगामातच विद्युत कार्यालयाद्वारे थकबाकीदार शेतकऱ्यांच्या पंपाची वीज खंडित केली जात आहे. आधीच नापिकीमुळे खचलेल्या शेतकऱ्यांवर मोठा आघात झाला आहे. वास्तविक अनेक शेतकऱ्यांची धान विक्री व बोनसची रक्कम शासनाकडे थकीत आहे. त्यामुळे वीजबिलाची रक्कम भरण्यास अडचण जात आहे. ही अडचण लक्षात घेत बिलाचा भरणा करण्यात मुदतवाढ देण्यात यावी व खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली. तहसीलदार सोमनाथ माळी व महावितरण कंपनीचे उपअभियंता यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, शेतकरी गुणवंत कवाडकर, फाल्गुन फुले, देवराव ठलाल, मुरलीधर कवाडकर, फाल्गुन मेश्राम, धर्मेंद्र परिहार, रत्नघाेष हुमने, हिराजी मानकर, सत्यवान बघेल, देवना दखने, राजू कवाडकर यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.

050721\img-20210705-wa0163.jpg

अभियंता याना घेराव व निवेदन देताना सूरेंन्द्रसिंह चंदेल व शेतकरी

Web Title: Farmers in the valley hit the tehsil and electricity office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.