शेतकऱ्यांना धानाच्या बाेनसची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:35 AM2021-05-17T04:35:02+5:302021-05-17T04:35:02+5:30

आधारभूत किंमत आणि शासनाने जाहिर केलेला बाेनस शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. याचा फायदा घेण्यासाठी अनेक शेतकरी आधारभूत धान खरेदी केंद्रावर ...

Farmers wait for the grain ban | शेतकऱ्यांना धानाच्या बाेनसची प्रतीक्षा

शेतकऱ्यांना धानाच्या बाेनसची प्रतीक्षा

Next

आधारभूत किंमत आणि शासनाने जाहिर केलेला बाेनस शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. याचा फायदा घेण्यासाठी अनेक शेतकरी आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्याकडे वळले. परंतु धान विक्री करण्यासाठी सातबारा नाेंदणी करण्यापासून शेतकऱ्यांना टाेकनचा नंबर लागणे, धान विक्री करणे, बिल घेणे तसेच ऑनलाईन नाेंदणी हाेण्यासाठी प्रतीक्षा करणे यासारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागताे. एकदा धान विक्री केल्यानंतर शेतकरी सुस्कारा साेडतात; परंतु जसजसे खरीप हंगामाचे दिवस येतात, तसतशी पैशांची गरज भासते. मानापूर-देलनवाडी परिसरातील शेतकऱ्यांना धानाचे चुकारे मिळाले असले तरी त्यांना अद्यापही बाेनसची रक्कम मिळाली नाही. खरीप हंगामासाठी पैशांची आवश्यकता असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांना धानाचा बाेनस लवकर वितरित करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Farmers wait for the grain ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.