शेतकऱ्यांना सौर पंपाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 10:58 PM2019-07-15T22:58:29+5:302019-07-15T22:58:47+5:30
मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषीपंप देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही जिल्ह्यातील एकाही शेतकºयाला सोलर कृषीपंप देण्यात आले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषीपंप देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही जिल्ह्यातील एकाही शेतकºयाला सोलर कृषीपंप देण्यात आले नाही.
मार्च २०१८ पूर्वी ज्या शेतकºयांनी पैसे भरले आहेत, मात्र त्यांना कृषीपंपासाठी वीज पुरवठा झाला नाही, अशा शेतकºयांना उच्चदाब प्रणालींतर्गत उच्चदाब लाईन टाकून दिली जात आहे. एप्रिल २०१८ नंतर ज्या शेतकºयांचे अर्ज प्राप्त होत आहेत, त्यांना सौर कृषीपंप दिले जाणार आहेत. यासाठी जिल्हाभरातील शेतकºयांकडून अर्ज मागविले जात आहेत. कृषीपंपासाठी जिल्हाभरातील शेतकºयांकडून ३ हजार ५६० अर्ज प्राप्त झाले. कृषीपंपासाठी खुल्या प्रवर्गातील शेतकºयाला तीन एचपीच्या पंपासाठी १६ हजार ५६० रुपये तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकºयांना ८ हजार २८० रुपये भरावे लागतात. त्यानंतरच त्यांना सौर कृषीपंप उपलब्ध करून दिले जाते. जिल्हाभरातील १ हजार ८२ शेतकºयांनी डिमांड भरले आहेत.
सौर कृषीपंप देण्याची योजना राज्य शासनाने वर्षभरापूर्वी सुरू केली. मात्र अजूनपर्यंत या योजनेंतर्गत अर्ज मागविण्याचीच प्रक्रिया सुरू आहे. गडचिरोलीच नव्हे तर राज्यभरातील एकाही शेतकºयाला वर्षभराचा कालावधी उलटूनही एकही सौरकृषीपंप देण्यात आला नाही. डिमांड भरलेले शेतकरी आपल्याला सौर कृषीपंप कधी मिळेल, याची प्रतीक्षा करीत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील शेतकºयांसाठी लाभदायक
गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या विरळ आहे. अनेक गावे जंगलाने व्यापली आहेत. या जंगलातूनच वीज तारा गेल्या आहेत. वादळवारा झाल्यानंतर वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार नेहमी घडतात. एकदा वीज खंडीत झाल्यानंतर पुन्हा सुरू होण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो. अशा परिस्थितीत सौरकृषीपंप फायदेशीर ठरणार आहे. शेतकºयाला कधीही वीज उपलब्ध होईल.
वीज पुरवठा यंत्रणेतील तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्यात महावितरणचे बरेच कर्मचारी व्यस्त राहतात. त्यातही कृषीपंपासाठी दिलेल्या लाईनवरील बिघाड दुरूस्त करायचा असेल तर शेतात जावे लागते. यामध्ये बराच वेळ व श्रम लागतो. सौर कृषीपंपामुळे हा वेळ व श्रम वाचण्यास मदत होणार आहे.