शेतकरी चिंताग्रस्त
By admin | Published: June 16, 2014 08:01 AM2014-06-16T08:01:38+5:302014-06-16T08:22:21+5:30
जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे चालू वर्षी ही कामे करण्यात शेतकर्यांना अधिक मदत झाली
जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे चालू वर्षी ही कामे करण्यात शेतकर्यांना अधिक मदत झाली. परंतु पेरणीयोग्य जमीन असतानाही पावसाच्या अनुपस्थितीमुळे अद्यापही खरिपाच्या पेरण्या प्रतीक्षेत राहिल्याने बळीराजाची चिंता अधिक वाढू लागली आहे. साधारण एका आठवड्यापूर्वी परिसरात खरीपपूर्व पेरणीची कामे सुरु होती. मात्र, वरुणराजाने लावलेल्या विलंबामुळे शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसला. तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील आदिवासी जनतेला अजूनही दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील भीमाशंकर खोर्यातील पाण्याचे साठे संपले असून, या परिसरातील आदिवासी जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गतवर्षापेक्षा चालू वर्षी पावसाने अचानक दडी दिल्याने या भागातील लोकांना चातक या पक्ष्याप्रमाणे पावसाची वाट पाहण्याची वेळ आली आहे. आंबेगाव तालुक्याचा पश्चिम आदिवासी भाग हा मुसळधार पावसाचे माहेरघर समजला जातो. पावसाळ्यातील चार महिने या भागात मुसळधार पाऊस पडूनही या भागातील लोकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी चारही दिशा फिराव्या लागतात. ऐनवेळी पावसाळा तोंडावर येऊनही आदिवासी भागातील तळेघर, पालखेवाडी, फळोदे, हरणमाळ, सावरली व या गावांतील वाड्या-वस्त्यांना मोठय़ा प्रमाणात दुष्काळाशी सामना करावा लागतो आहे. शासनाकडून आदिवासी भागासाठी शिवकालीन खडकातील टाक्या, शिवबुडीत बंधारे यासाठी मोठय़ा प्रमाणात निधी वापरला जातो. या भागामध्ये याची कामेही मोठय़ा प्रमाणात चालू आहे. परंतु ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची केली जात असल्यामुळे पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणात पाणी साचूनही उन्हाळा सुरू होताच या जलस्रोतांमध्ये पाण्याचा थेंबही राहत नाही. या भागात होणारे बुडित बंधारे व पाझर तलाव अशा ठिकाणी केले जातात, की ज्यामध्ये पाणी साठताच पाण्याचा लवकरात लवकर निचरा होऊन हे जलस्रोत कोरडे पडतात. याचा स्थानिक जनतेला कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही. डिंभे धरण या आदिवासी भागाच्या अगदी उशाला असून वर्षानुवर्षे या भागातील जनतेच्या घशाला कोरड पडली आहे. ४प्रशासनाकडून या भागासाठी केवळ एक टँकर पुरवठा करण्यात आला आहे. परंतु एवढय़ा गावांसाठी एक टँकर पुरत नसल्यामुळे पाण्यासाठी आदिवासी महिलांना मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. या परिसरातील जलसाठे संपले असल्यामुळे टँकर भरण्यासाठी डिंभे धरणावर जावे लागते. त्यामुळे दिवसातील एक ते दोन वेळा हा टँकर पाणीपुरवठा करतो. त्यामुळे टँकरचा पुरवठा करूनही या भागातील लोकांना त्याचा फारसा उपयोग होत नाही. ■ शासकीय मालमत्तेचे नुकसान करणार्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, डिंभे धरणातून सोडलेले पाणी कालव्याच्या शेवटच्या टोकाला पोहचले, की पाणी सोडणे बंद केले जाणार आहे. मुळात धरणात अत्यल्प पाणीसाठा राहिला आहे. ■ ज्या शेतकर्यांकडे बैल अथवा इतर मशागतीची साधणे आहेत त्यांनी मशागतीची काही प्रमाणात कामे सुरू केली आहेत. मात्र, ज्या शेतकर्यांना पैसे देऊन भाडोत्री पद्धतीने मशागतीची कामे करून घ्यावी लागतात असे शेतकरी मशागत करण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे चित्र या पाहावयास मिळत आहे. शेलपिंळगाव : मृग नक्षत्र सुरु होऊन आठवडा उलटला असला तरीसुद्धा वरुणराजाची अपेक्षित तेवढी कृपा होत नसल्याने, जिल्ह्यातील खेडसह शिरूरच्या पश्चिम भागातील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. मृग नक्षत्रात झालेल्या पिकांच्या पेरण्या वाढीच्या तसेच उत्पादनाच्या दृष्टीने किफायतशीर असल्याने बळीराजा याच नक्षत्रात पिकांच्या पेरणीला प्रधान्न देत असतो. विशेषता: भुईमुग, बाजरी, मुग, कडधान्य, पालेभाज्या या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी खरीपात केली जाते. पेरणीपूर्व शेतीची मशागत करून तसेच जमिनीला खतावणी टाकून शेती पेरणीयोग्य करण्यात आलेली असून, शेतकर्यांना फक्त आता मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा लागलेली आहे. पावसाळी हंगामाची सुरुवात ही शेती हंगामाची सुरुवात असल्यने, या वर्षीच्या शेती हंगामी वर्षाला मागील आठवड्यातील ७ तारखेला सुरुवात झाली. मृग नक्षत्र प्रारंभी येत असल्याने या नक्षात्रात हमखास पावसाची हमी शेतकरी बाळगत असतो. उन्हाळी हंगामाच्या समाप्तीपासून जमिनीच्या मेहनतीच्या कामांची हाताळणी करून जमिनीला पिकांच्या उगवणीसाठी सर्वतोपरी पोषक बनवले आहे. भानुदास पर्हाड काळी आई तहानलेली : जून महिन्याची १५ तारीख उजाडली, तरीही अद्याप जिल्ह्यात पावसाला सुरूवात झालेली नाही. शेतकर्यांची काळी आईतहानली असून, पेरण्या खोळंबल्या आहेत. धरणे आटली असून, पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे पाणीटंचाई तीव्र झाली आहे. दौंडच्या जिरायत भागात खरीप हंगामाची धास्ती वासुंदे : दौंड तालुक्याच्या जिरायत भागातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. या आठवड्यात पुरेसा पाऊस झाला नाही, तर खरीप हंगामामध्ये घेतल्या जाणार्या पिकांची पेरणी करणे अवघड होणार आहे. परिणामी, पावसाअभावी खरीप हंगाम वाया जाण्याच्या भीतीने बळीराजा धास्तावला आहे. परिसरातील कौठडी, जिरेगाव, लाळगेवाडी, वासुंदे, हिंगणीगाडा, पांढरेवाडी, रोटी, कुसेगाव, पडवी, देऊळगावगाडा, खोर या भागातील शेती आजही केवळ पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामातील पिकांसाठी पावसाची नितांत गरज आहे. जर या भागामध्ये पाऊस चांगला पडला, तर विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होऊन ते पिकांना देणे शेतकर्यांना शक्य होते. मात्र, सद्यपरिस्थितीत ऐन पावसाळ्य़ाचे दिवस असताना तीव्र उन्हाचे चटके या भागात जाणवत असून, उष्णताही अद्याप कमी झालेली नाही. परिणामी, खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीची कामे करण्यास शेतकर्यांमध्ये उत्साह आढळून येत नाही. शेतकरी एकमेकांमध्ये पाऊस कधी पडणार, याचीच चिंता करत असल्याची परिस्थिती या भागात निर्माण झाली आहे. अर्धा जून महिना संपून गेला असून, भरवशाचे मृग नक्षत्रही कोरडेच चालल्याने शेतकरी आणखीनच चिंताग्रस्त झाला आहे. डिंभे कालव्याचे पाणी पिण्यासाठीच वापरा मंचर : डिंभे धरणातून उजव्या कालव्यात पिण्याच्या पाण्यासाठी १८0 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. मात्र काही जण कालव्याचे बांधकाम फोडून शासकीय मालमत्तेचे नुकसान करुन कालव्यातून पाणी घेऊ पाहत आहेत, अशांवर कारवाई करण्याचे संकेत पाटबंधारे विभागाने दिले आहेत. कालव्यातील पाणी केवळ पिण्यासाठी वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनांवर परिणाम होऊन पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार डिंभे धरणातून १८0 क्युसेक्सने पाणी कालव्यात सोडण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता डी.बी. कराळे यांनी दिली. कालव्याला सोडलेले पाणी हे केवळ पिण्यासाठी आहे, ते शेतीसाठी वापरता येणार नाही. कालव्यातील पाणी लाखणगावच्या आसपास पोहचले आहे. मात्र काही जण शेतीसाठी कालव्यातील पाणी काढून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. कालव्याचे बांधकाम फोडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले जाते. पाटबंधारे विभागाकडून गस्त घातली जात असली तरी असे प्रकार सर्रास घडत आहेत. याबाबत पाटबंधारे विभागाने कडक भूमिका घेतली आहे. (वार्ताहर)