२४ तास विजेसाठी शेतकऱ्यांचा महावितरणसमाेर ठिय्या

By दिगांबर जवादे | Published: October 20, 2023 06:48 PM2023-10-20T18:48:22+5:302023-10-20T18:49:05+5:30

चामोर्शी तालुक्यात कृषी वाहिनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्यात येत आहे.

Farmers'agitation for 24 hours electricity in gadchiroli | २४ तास विजेसाठी शेतकऱ्यांचा महावितरणसमाेर ठिय्या

२४ तास विजेसाठी शेतकऱ्यांचा महावितरणसमाेर ठिय्या

गडचिराेली :  कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा या प्रमुख मागणीच्या पूर्ततेसाठी भारतीय शेतकरी एकता पॅनल घारगाव व कळमगाव फिडरच्या शेकडो शेतकऱ्यांनी चामाेर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील वीज वितरण विभागाच्या कार्यालयासमोर शुक्रवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला आह़े.

चामोर्शी तालुक्यात कृषी वाहिनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्यात येत आहे. सध्या शेतकऱ्यांचे धान गर्भात आहे. त्यामुळे आता धानाला पाण्याची खूप आवश्यकता आह़े पाणी न मिळाल्या हातात आलेले धान पीक करपण्याचा धाेका निर्माण झाला आहे. त्यामुळे २४ तास वीज पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी भारतीय शेतकरी एकता पॅनलतर्फे भेंडाळा येथील महावितरण कार्यालय च्या समोर शेकडो शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आह़े जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही असा पवित्रा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतला आह़े.    

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या                             
भेंडाळा सबस्टेशन अंतर्गत येणारे घारगाव व कळमगाव फिडरचे भार नियमन बंद करावे, भारनियमनामुळे शेतपीक नष्ट होत असेल तर महावितरणने ती जबाबदारी घ्यावी, कृषिवीज बिलांमध्ये सूट द्यावी, आदी मागण्यांसाठी आंदाेलन केले जात आहे.

Web Title: Farmers'agitation for 24 hours electricity in gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.