गडचिरोली जिल्ह्यातील भेंडाळ्यात बहरतेय 'ॲपल बोरां'ची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 07:10 AM2021-12-24T07:10:00+5:302021-12-24T07:10:01+5:30

Gadchiroli News चामोर्शी तालुक्यातील भेंडाळाचे शेतकरी शेखर दास यांनी आपल्या शेतात ॲपल (सफरचंद) बोरांची शेती विकसित केली आहे. त्यांचा हा प्रयोग धानाच्या पारंपरिक पिकात जखडलेल्या इतर शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणारा आहे.

Farming of 'Apple bor' flourishing in Bhendal in Gadchiroli district | गडचिरोली जिल्ह्यातील भेंडाळ्यात बहरतेय 'ॲपल बोरां'ची शेती

गडचिरोली जिल्ह्यातील भेंडाळ्यात बहरतेय 'ॲपल बोरां'ची शेती

googlenewsNext
ठळक मुद्देप्रयोगशील शेतकऱ्याचा अभिनव आधुनिक प्रयोग

रोशन थोरात

गडचिरोली : शेती म्हणजे एक प्रकारचा जुगार, कधी चांगली पिकते तर कधी नुकसान होते असे म्हटले जाते. अर्थात त्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. मात्र सर्व अडचणींवर मात करत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच वापर करत चामोर्शी तालुक्यातील भेंडाळाचे शेतकरी शेखर दास यांनी आपल्या शेतात ॲपल (सफरचंद) बोरांची शेती विकसित केली आहे. त्यांचा हा प्रयोग धानाच्या पारंपरिक पिकात जखडलेल्या इतर शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणारा आहे.

दास यांनी त्यांच्या सव्वाएकर जमिनीमध्ये ४०० रोपट्यांची लागवड केली. त्या रोपट्यांचे झाड होण्यासाठी ९ महिने २० दिवसांचा कालावधी लागला. एका झाडामधून साधारणपणे १० किलो ॲपल बोर निघत असतात. ते बोर बाजारामध्ये ८० रुपये किलोप्रमाणे विकले जातात. या शेतीमधून त्यांना जवळपास तीन ते साडेतीन लाखांचे उत्पन्न होत आहे.

चामोर्शी तालुक्यातील अनेक नागरिक ही बोरांची शेती बघायला येत असतात. त्यांच्याकडून शेतीबद्दल माहिती घेत राहतात. काही उत्साही युवकांनी याबाबतची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली. त्यामुळे इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळत आहे. राहुल वैरागडे, चेतन कोकावार, आदर्श वडेट्टीवार, प्रशांत कुसराम, संकेत सुरजागडे, लावण्या चौधरी आदी युवा त्यासाठी सदर शेतकऱ्याला मदत करत आहेत.

Web Title: Farming of 'Apple bor' flourishing in Bhendal in Gadchiroli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती