लखमापूर बोरीतील रस्ता शेणखताने व्यापला

By Admin | Published: June 19, 2017 01:49 AM2017-06-19T01:49:04+5:302017-06-19T01:49:04+5:30

चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी- वाकडी मार्गावर काही नागरिकांनी शेण खताचे ढिगारे ठेवले आहेत.

The farming of road in Lakhmapur sack covers | लखमापूर बोरीतील रस्ता शेणखताने व्यापला

लखमापूर बोरीतील रस्ता शेणखताने व्यापला

googlenewsNext

जागोजागी ढिगारे : हटविण्याकडे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
लखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी- वाकडी मार्गावर काही नागरिकांनी शेण खताचे ढिगारे ठेवले आहेत. सध्या सदर ढिगारे पूर्णत: रस्त्यावर पसरले असून येथून आवागमन करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावरील ढिगारे तत्काळ हटवावे, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.
लखमापूर बोरी- वाकडी मार्गावरून नेहमीच बैलगाड्या व वाहनांचे आवागमन असते. वाकडी येथील नागरिक बोरीकडे येण्याचा एकमेव मार्ग असल्याने त्यांना या ढिगाऱ्यांचा वास व त्रास सहन करावा लागत आहे. सध्या रस्त्याच्या बाजूचे ढिगारे पूर्णत: रस्त्यावर पसरले आहेत. शेणखतही रस्त्यावर आल्याने पावसाळ्यात वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावाच्या सौंदर्यीकरणात अडथळा येत आहे. त्यामुळे रस्त्यावर शेणखत टाकणाऱ्या लोकांवर कढोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Web Title: The farming of road in Lakhmapur sack covers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.