तहसीलदारांच्या विरोधात उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 10:25 PM2018-04-12T22:25:09+5:302018-04-12T22:25:09+5:30
अहेरी येथील तहसीलदार प्रशांत घोरूडे हे आपला मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करून अहेरी तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री यांच्या नेतृत्वात भाजपा कार्यकर्ते व नागरिकांनी गुरूवारपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : अहेरी येथील तहसीलदार प्रशांत घोरूडे हे आपला मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करून अहेरी तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री यांच्या नेतृत्वात भाजपा कार्यकर्ते व नागरिकांनी गुरूवारपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे.
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या २०१७ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत घोरूडे यांनी पेंडाल, कॅटर्स यांचे बिल धनादेशाद्वारे न देता रोखीने दिले आहेत. २ हजार १४ ब्रास मुरूमाचे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई केली नाही. घोरूडे हे जनतेची कामे वेळेवर करीत नाही. जनतेशी उद्धटपणे वागतात. ५० ते १०० किमी अंतरावरून येणाºया जनतेला न भेटताच त्यांची कामे करण्यास दिरंगाई केली जाते. अहेरी तहसील कार्यालयाची नियमबाह्य स्थानांतरण केले, असा आरोप रवी नेलकुद्री यांनी करीत उपोषणाला सुरूवात केली आहे.