बिनागुंडा परिसराच्या विकासासाठी उपोषण

By admin | Published: June 14, 2016 01:06 AM2016-06-14T01:06:48+5:302016-06-14T01:06:48+5:30

लाहेरी ते बिनागुंडा दरम्यानचा मार्ग तयार करून बिनागुंडा परिसरातील गावांचा विकास करावा, यासह इतर

Fasting for the development of Nanggunda area | बिनागुंडा परिसराच्या विकासासाठी उपोषण

बिनागुंडा परिसराच्या विकासासाठी उपोषण

Next

भामरागड : लाहेरी ते बिनागुंडा दरम्यानचा मार्ग तयार करून बिनागुंडा परिसरातील गावांचा विकास करावा, यासह इतर मागण्यांसाठी रूपलाल मारोती गोंगले यांनी तहसील कार्यालयासमोर १० जूनपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही, असा इशारा प्रशासनाला दिला आहे.
श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना व इतर निराधार योजनांच्या लाभार्थ्यांना प्रतिमहा तीन हजार रूपये मानधन देण्यात यावे, ४५ टक्के किंवा त्यापेक्षा कमी अपंगत्व असलेल्यांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा, त्यांचा बीपीएलमध्ये समावेश करावा, बंगाली नमोशुद्र या समाजातील नागरिकांचा अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश करून त्यांना जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी उपोषणाला सुरुवात केली आहे. तहसीलदार अरूण येरचे यांनी सोमवारी उपोषण स्थळाला भेट दिली. गोंगले यांच्या सर्व मागण्या वरिष्ठस्तरावरील असल्याने या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा गोंगले यांनी दिला.

Web Title: Fasting for the development of Nanggunda area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.