दोषपूर्ण ब्रेकरमुळे अपघात वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 05:00 AM2020-08-24T05:00:00+5:302020-08-24T05:01:00+5:30
गतीरोधक तयार करताना तो व्यवस्थित असणे आवश्यक आहे. मात्र वैरागडात तयार करण्यात आलेला गतिरोधक अतशिय दोषपूर्ण आहे. दोन्ही बाजुला उतार दिला नाही. एखाद्या तलावाच्या पाळीप्रमाणे रस्त्यावर उंचवटा तयार करून ठेवला आहे. गतिरोधकावरून वाहन नेताना वाहनाची चाके एकदम गतिरोधकाला जाऊन धडकतात. त्यामुळे या ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात वाढले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : येथील जुन्या बाजार चौकापासून ते बसस्थानकादरम्यान ३०० मीटरच्या सिमेंट रस्त्याचा दोन्ही टोकावर दोषपूर्णरित्या ब्रेकरचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात वाढले आहेत. विद्यार्थ्यांचाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रस्त्यावर गतीरोधक तयार करण्याचे काही नियम आहेत. वाहनाची गती कमी करणे एवढाच उद्देश गतिरोधकाचा आहे. त्यामुळे गतीरोधक तयार करताना तो व्यवस्थित असणे आवश्यक आहे. मात्र वैरागडात तयार करण्यात आलेला गतिरोधक अतशिय दोषपूर्ण आहे. दोन्ही बाजुला उतार दिला नाही. एखाद्या तलावाच्या पाळीप्रमाणे रस्त्यावर उंचवटा तयार करून ठेवला आहे. गतिरोधकावरून वाहन नेताना वाहनाची चाके एकदम गतिरोधकाला जाऊन धडकतात. त्यामुळे या ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात वाढले आहेत. विशेष करून रात्रीच्या सुमारास गतिरोधक दिसून येत नाही. त्यामुळे या गतिरोधकाला वाहने धडकत आहेत. परिणामी गतिरोधकामुळे अपघात कमी होण्याऐवजी वाढले आहेत.
एका बाजुला जिल्हा परिषद कन्या शाळेचे प्रवेशद्वार तर दुसऱ्या बाजुला महाराष्टÑ विद्यालयाचे प्रवेशद्वार आहे. ब्रेकर चुकीच्या पध्दतीने बांधण्यात आला असल्याने वाहनधारक रस्ताच्या बाजुने वाहने टाकतात. बाजुला जिल्हा परिषद शाळेचे प्रवेशद्वार आहे. एखादा विद्यार्थी शाळेतून रस्त्यावर येतेवेळी त्याला वाहन धडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही बाजुला शाळा असल्याने या ठिकाणी गतिरोधक बांधणे आवश्यक होते. मात्र गतिरोधक बांधण्याचे नियम पाळण्यात आले नाही.
अभियंत्याचे दुर्लक्ष
कंत्राटदाराकडून काम व्यवस्थित करून घेणे हे अभियंत्याचे काम आहे. मात्र कंत्राटदाराने चुकीच्या पध्दतीने गतिरोधकाचे काम केले. एखाद्या सामान्य व्यक्तीने गतिरोधकावर एक नजर टाकली तरी गतिरोधकाचे बांधकाम कसे दोषपूर्ण आहे, हे लक्षात येते. असे असतानाही अभियंत्याच्या कसे काय लक्षात आले नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे. कंत्राटदारांकडून टक्केवारी घेण्याची सवय झालेल्या अभियंत्याने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले आहे.