बाजार समित्यांच्या प्रशासकीय मंडळ सदस्यांचा सत्कार

By admin | Published: September 18, 2015 01:15 AM2015-09-18T01:15:20+5:302015-09-18T01:15:20+5:30

आरमोरी व गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ राज्य शासनाच्या सहकार पणन विभागाने बसविले आहे.

Felicitated members of the board of committees of the Board | बाजार समित्यांच्या प्रशासकीय मंडळ सदस्यांचा सत्कार

बाजार समित्यांच्या प्रशासकीय मंडळ सदस्यांचा सत्कार

Next

अरविंद पोरेड्डीवार यांचे प्रतिपादन : संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम करू
आरमोरी : आरमोरी व गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ राज्य शासनाच्या सहकार पणन विभागाने बसविले आहे. या प्रशासकीय मंडळातील सदस्यांचा सत्कार गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आरमोरीच्या सभागृहात बुधवारी करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, संचालक खेमनाथ डोंगरवार, जागोबा खेळकर, पोपटराव तितीरमारे, डॉ. दुर्वेश भोयर, बंडुजी ऐलावार, डॉ. बळवंत लाकडे, विदर्भ अर्बन कोआॅपरेटिव्ह असोसिएशनचे संचालक प्रशांत पोरेड्डीवार आदी उपस्थित होते.
यावेळी गडचिरोली येथील बाजार समितीचे मुख्य प्रशासक शशिकांत साळवे, उपमुख्य प्रशासक रामदास पिपरे, आरमोरीचे मुख्य प्रशासक खिळसागर नाकाडे, उपमुख्य प्रशासक ईश्वर पासेवार, कोरची खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष आसाराम सांडील, कुरखेडाचे व्यंकटी नागीलवार, वडसाचे टिकले, आरमोरीचे मनोज मने व इतर संस्थाच्या नवनिर्वाचीत संचालकांचा अरविंद पोरेड्डीवार, प्रकाश पोरेड्डीवार, श्रीहरी भंडारीवार, अनंत साळवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना अरविंद पोरेड्डीवार यांनी सहकार क्षेत्राला बळकटी आणण्यासाठी सर्व सहकारी संस्थांच्या संचालकांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. सत्ता येते जाते, मात्र सामान्य कार्यकर्त्यांशी कौंटुबीक संबंध टिकून राहणे आवश्यक आहे. त्याकरिताच हा सामान्य कार्यकर्त्यांचा सत्कार आज होत आहे, असे प्रतिपादन केले. सहकार क्षेत्राच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आपण प्रयत्न करू, असेही यावेळी म्हणाले. संचालन ए. आर. निंबेकर, प्रास्ताविक तांबोळे तर आभार मुख्य कार्यकारी अधिकारी एस. पी. आयलवार यांनी मानले. कार्यक्रमाला टी. डब्ल्यू. भुरसे, शाखा व्यवस्थापक पुणेकर, विधी अधिकारी अविनाश मूर्वतकर, किरण सांबरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Felicitated members of the board of committees of the Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.