तुळशीत जवानांच्या माता-पित्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 01:34 AM2019-02-21T01:34:16+5:302019-02-21T01:35:07+5:30
येथील गाव विकास युवक मंडळाच्या वतीने देशसेवा करीत असलेल्या गावातील जवानांच्या माता-पित्यांचा व गाव विकासात महत्वाचे योगदान दिलेल्या गावातील व्यक्तींचा तसेच गुणवताप्राप्त विद्यार्थ्यांच्या पित्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुळशी : येथील गाव विकास युवक मंडळाच्या वतीने देशसेवा करीत असलेल्या गावातील जवानांच्या माता-पित्यांचा व गाव विकासात महत्वाचे योगदान दिलेल्या गावातील व्यक्तींचा तसेच गुणवताप्राप्त विद्यार्थ्यांच्या पित्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शिवजयंतीनिमित्त मंगळवारी घेण्यात आलेला हा कार्यक्रम कौतुकाचा विषय ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रेखा तोंडफोडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपसरपंच मुरलीधर दुनेदार, ग्रा.पं. सदस्य सत्यवान लोणारे, भारिप-बमसंचे पदाधिकारी नसीर जुम्मन शेख, सुरेश नागरे, उर्वशी राऊत, सुमित्रा मारबते, चित्रकला लोणारे, तंमुस अध्यक्ष मधुकर सुकारे, पोलीस पाटील तेजस्वीनी दुनेदार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नेताजी दुनेदार, एकनाथ वघारे, उमाजी दुनेदार, विजय लोणारे, माजी सरपंच वाय. बी. मेश्राम, बंडू सुकारे, पद्माकर राऊत, राजेश मारबते, लंकेश्वर पत्रे, केवळराम दोनाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विविध संरक्षण दलात देशसेवा करीत असलेल्या जवानांचे माता पिता गुणाजी राऊत, कौसल्या राऊत, डॉ.माणीक सहारे, रघुनाथ रामटेके आदींचा सत्कार करण्यात आला. तसेच माजी सरपंच उमाकांत कुळमेथे, सेवानिवृत्त पोलीस पाटील कान्हाजी दुनेदार, माजी सरपंच कविश्वर दुनेदार, सामाजिक कार्यकर्ते राघोबा शेंडे, सेवानिवृत्त शिक्षक वसंतराव मिरगे, भिमराव वाघाडे, नथ्थु दुनेदार, शरद वाघाडे, माणिक दोनाडकर, यशवंत दोनाडकर, निलकंठ मारबते, अन्नाजी पत्रे, ऋषी दुनेदार, उमाजी चंडीकार, शामराव सोनवाने, नामदेव नेवारे, मदन सुकारे, सुरेश वझाडे, दिनकर सुकारे, महादेव ठाकरे यांचाही सत्कार करण्यात आला .
याप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी अ आणि ब अशा दोन गटात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अ गटातून प्रथम क्रमांक ईशा विजय लोणारे, द्वितीय क्रमांक कावेरी सुभाष दुनेदार, तृतीय क्रमांक आस्था मुन्ना लांडगे हिने मिळविला. ब गटातून प्रथम क्रमांक वैष्णवी प्रकाश पत्रे, द्वितीय यशश्री पुरुषोत्तम वाघाडे, तृतीय कुणाल दिलीप राऊत यांनी मिळवला. परीक्षक म्हणून पंकज धोटे, प्रदीप तुपट, कैलास गजापूरे यांनी काम पाहीले.
कार्यक्रमाचे संचालन विष्णू दुनेदार यांनी केले. कार्यक्रमासाठी गाव विकास युवक मंडळाच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.