प्रवाशांना वाचविणाऱ्या युवकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:40 AM2018-08-26T00:40:41+5:302018-08-26T00:42:30+5:30
तालुक्यातील नंदीगाव नाल्यावर नुकताच झालेल्या अतिवृष्टीमुळे अचानकपणे नाल्याचे पाणी वाढल्याने गडचिरोली-हैद्राबाद ही बस त्या नाल्यात बुडण्याच्या मार्गावर होती. दरम्यान स्थानिक युवकांनी शर्थीचे प्रयत्न करून सर्व प्रवाशांना या बसमधून सुरक्षित बाहेर काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : तालुक्यातील नंदीगाव नाल्यावर नुकताच झालेल्या अतिवृष्टीमुळे अचानकपणे नाल्याचे पाणी वाढल्याने गडचिरोली-हैद्राबाद ही बस त्या नाल्यात बुडण्याच्या मार्गावर होती. दरम्यान स्थानिक युवकांनी शर्थीचे प्रयत्न करून सर्व प्रवाशांना या बसमधून सुरक्षित बाहेर काढले. एवढ्यामोठ्या संकटातून प्रवाशांचे जीव वाचविणाऱ्या नंदीगाव, तिमरम, गुडडीगुडम येथील १२ आदिवासी युवकांचा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते शुक्रवारी अहेरीच्या राजमहालात शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सदर युवकांना रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्य सरकारतर्फे या बारा युवकांना शौर्य पुरस्कार मिळावा यासाठी लवकरच शिफारस करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री आत्राम यांनी यावेळी दिले.
नंदीगाव, तिमरम, गुड्डीगुडम या तीन गावातील विनोद करनम, श्रीकांत पेंदाम, सतीश पेंदाम, आनंदराव मडावी, राकेश सडमेक, श्रीकांत सडमेक, रुपेश पेंदाम, श्रीकांत सिडाम, नरेंद्र सडमेक, मुनेश्वर सिडाम, प्रमोद कोडापे, प्रभू कुसराम आदी बारा युवकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जि. प. समाज कल्याण सभापती माधुरी उरेते, अहेरीच्या नगराध्यक्ष हर्षा ठाकरे, बस आगार व्यवस्थापक युवराज राठोड, भाजपचे तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार, शहर अध्यक्ष मुकेश नामेवार, फिरोज शेख, गुड्डू ठाकरे यांच्यासह भाजपचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.