महिलांची मत्स्य व्यवसायात भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2017 01:29 AM2017-06-24T01:29:53+5:302017-06-24T01:29:53+5:30
तालुक्यातील मारोडा येथील महिला बचत गटाच्या सदस्यांनी मत्स्य व्यवसाय सुरू केला असून
प्रेरणादायी : नाबार्डच्या मदतीने सुरू केला व्यवसाय
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तालुक्यातील मारोडा येथील महिला बचत गटाच्या सदस्यांनी मत्स्य व्यवसाय सुरू केला असून या व्यवसायातून महिलांनी आर्थिक समृद्धी साधली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात तलावांची संख्या जास्त आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसायास अनुकूल वातावरण आहे. उन्हाळ्याच्या दिवसात माशांची मागणी वाढते. त्यामुळे किंमत वाढते. नाबार्डच्या मदतीने मारोडा येथील महिलांनी मत्स्य व्यवसाय सुरू केला आहे. या महिलांना नालंदा महिला शिक्षण संस्थेचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे. नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक कृष्णा कोल्हे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नियोजन व विकास अधिकारी आर. वाय. सोरते, शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष नालंदा देशपांडे, मुरलीधर मेश्राम, तन्मय देशपांडे यांनी प्रत्यक्ष तलावाला भेट देऊन महिलांच्या मार्फत चालविल्या जाणाऱ्या मत्स्य व्यवसायाविषयीची माहिती घेतली.
आर. वाय. सोरते यांनी मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या मार्फत चालविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. सहकारी संस्थांच्या तुलनेत महिला बचतगटांसाठी अधिक योजना कार्यरत आहेत. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. करूणा महिला बचत गटाच्या अध्यक्ष मनीषा बारसागडे यांनी बचतगटाची आर्थिक स्थितीची माहिती दिली. यावेळी सदस्या उपस्थित होत्या.