खतही महागले, शेती करायची कशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:39 AM2021-03-09T04:39:18+5:302021-03-09T04:39:18+5:30
अलिकडच्या काळात रासायनिक खताच्या शेतीवर टीका हाेत असली, तरी दर एकरी उत्पादन वाढविण्यास याच रासायनिक खतांनी मदत केली आहे. ...
अलिकडच्या काळात रासायनिक खताच्या शेतीवर टीका हाेत असली, तरी दर एकरी उत्पादन वाढविण्यास याच रासायनिक खतांनी मदत केली आहे. त्यामुळे आताही शेतकरी रासायनिक खतांचा वापर करताे. रासायनिक खत हा शेतीचा अविभाज्य घटक बनला आहे. शेतीच्या एकूण उत्पादन खर्चात रासायनिक खतांवर हाेणाऱ्या खर्चाचा वाटा जवळपास २० टक्के आहे. पुढील आर्थिक वर्षापासून केंद्र शासनाने खतांच्या किमतीमध्ये जवळपास २५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रतीबॅग जवळपास २०० ते ३०० रुपये किमत वाढणार आहे. आधीच महागाई वाढत आहे, त्यातच आता खतांच्याही किमती वाढल्याने शेतकरी चिंतेत आहे. शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमाेर निर्माण झाला आहे.
बाॅक्स
विदेशातून हाेते आयात
सर्वच प्रकारचे रासायनिक खत विदेशातून आयात करावे लागतात. देशात फक्त त्याची पॅकिंग व मिक्सिंगचे काम हाेते. विदेशात खतांच्या किमती वाढल्या असल्याने देशातही किमती वाढविल्या जात आहेत.
रासायनिक खतांमुळे उत्पादनात वाढ झाली असली, तरी शेतमालाचा दर्जा घसरला आहे. तसेच उत्पादन खर्चातही वाढ झाली आहे. या दाेन्ही समस्यांपासून मुक्तता मिळविण्यासाठी सेंद्रीय खतांचा वापर करण्याचे आवाहन व प्रशिक्षण कृषी विभागामार्फत दिले जात आहे. शेतकऱ्यांनी आता सेंद्रीय खतांचा वापर करण्याची गरज आहे.
६५ हजार मेट्रीक टन खताचा वापर
जिल्हाभरातील शेतकरी वर्षभरात सुमारे ६५ हजार मेट्रीक टन रासायनिक खताचा वापर करीत असल्याची नाेंद कृषी विभागाकडे आहे. एवढ्या माेठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर हाेत असल्याने किंमत वाढीचा थेट परिणाम उत्पादन खर्चावर व शेतकऱ्यांच्या नफ्यावर हाेणार आहे.
इतर जिल्ह्यांपेक्षा किमती अधिक
गडचिराेली जिल्ह्यात एकमेव देसाईगंज येथे रेल्वे रॅक पाॅईंट आहे. याच ठिकाणी खत उतरविले जाते. देसाईगंज हे जिल्ह्याच्या उत्तर टाेकावर आहे. दक्षिणेच्या टाेकावर असलेल्या सिराेंचा तालुक्यातील ३०० किमीपर्यंत खताची वाहतूक ट्रकच्या साहाय्याने करावी लागते. खत कंपन्या १३० किमीपर्यंत वाहतूक खर्च जाेडत नाहीत. १३० पेक्षा अधिक अंतर असल्यास वाहतूक खर्च दुकानदारांवर व अप्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांवर लादला जातो. जिल्ह्याचा विस्तार लक्षात घेता वाहतूक खर्च अधिक पडतो. तसेच यावर्षी डिझेलचे दर वाढल्याने वाहतूक खर्चही वाढणार आहे.
प्रतिक्रिया
रासायनिक खतांमुळेच शेतीचा उत्पादन खर्च वाढून शेती अडचणीत आली आहे. रासायनिक खतांच्या किमती पुन्हा वाढल्या असल्याने शेतकऱ्यांनी आता सेंद्रीय शेतीकडे वळण्याची गरज आहे. पूर्वी उत्पादन कमी हाेते, तरीही शेती फायद्यात हाेती. आता उत्पादन वाढले तरी शेती ताेट्यात जात आहे. याचा विचार शेतकऱ्यांनी करण्याची गरज आहे.
- शिवराम डाेमळे, शेतकरी
रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतीचे माेठे नुकसान झाले आहे. मात्र नाइलाजास्तव खताचा वापर करावा लागत आहे. रासायनिक खतांमुळे शेतजमीन नापिक बनत चालली आहे. शेतकऱ्यांनी मर्यादित प्रमाणातच खतांचा वापर करावा.
- डंबाजी पेंदाम, शेतकरी
खताचा प्रकार आताची किंमत नंतरची किंमत
डीएपी १२५० १४५०
एमओपी ९७० १८७०
२०-२०-०-१३ १००० १२००
१५-१५-१५ १०६० १२६०गडचिराेली : नवीन आर्थिक वर्षापासून रासायनिक खतांच्या किमती जवळपास २५ टक्क्यांनी वाढणार आहेत. त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च पुन्हा वाढणार आहे. त्यामुळे शेती करायची कशी, अशी प्रतिक्रिया जिल्हाभरातील शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.