मेळाव्यातून दिव्यांगाच्या योजनांचा केला जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2017 12:52 AM2017-06-27T00:52:54+5:302017-06-27T00:52:54+5:30

आ. डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकारातून गडचिरोली नगर परिषदेच्या आवारात सोमवारी दिव्यांग नागरिकांचा मेळावा घेण्यात आला.

The festival was organized by Divyangan scheme Jagar | मेळाव्यातून दिव्यांगाच्या योजनांचा केला जागर

मेळाव्यातून दिव्यांगाच्या योजनांचा केला जागर

Next

आरोग्य तपासणी : पावसातही उत्स्फूर्त प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आ. डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकारातून गडचिरोली नगर परिषदेच्या आवारात सोमवारी दिव्यांग नागरिकांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात दिव्यांगांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. दिवसभर रिमझिम पाऊस सुरू असतानाही या मेळाव्याला जिल्ह्याच्या विविध भागातून शेकडो अपंग व्यक्तींनी हजेरी लावली होती.
सदर दिव्यांग मेळाव्याच्या आयोजनाची कोणतीही निमंत्रण पत्रिका प्रकाशित करण्यात आली नाही. केवळ व्हॉटसअप, फेसबुक यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. तरीही या मेळाव्याला दिव्यांगांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर मेळाव्याचे उद्घाटन आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, पाणीपुरवठा सभापती केशव निंबोळ, नगरसेवक प्रमोद पिपरे, प्रकाश गेडाम, नंदू काबरा, भूपेश कुळमेथे, प्रवीण बागरे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सावंगी मेघे येथील रुग्णालयाचे डॉ. पोद्दार व त्यांच्या चमूने दिव्यांग नागरिकांची आरोग्य तपासणी केली. दिव्यांग जोडप्यांची विवाह नोंदणी तसेच विविध योजनांचे अर्ज यावेळी भरून घेण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिव्यांगांशी संवाद साधून योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

Web Title: The festival was organized by Divyangan scheme Jagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.