महिलांचा कोंडमारा दूर करणारा सण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 10:38 PM2019-01-21T22:38:03+5:302019-01-21T22:38:29+5:30

संक्रांतीच्या निमित्ताने गृहिणींना घराबाहेर पडण्याची संधी मिळते. एरवी वर्षभर संसारात गुरफटून राहणाऱ्या महिलांना त्यांचे विचार प्रकट करता येतात. यातून अनेक महिलांचा घरात होणारा कोंडमारा दूर होतो. महिला संक्रांतीचे वाण देतात आणि घेतात.

The festivities | महिलांचा कोंडमारा दूर करणारा सण

महिलांचा कोंडमारा दूर करणारा सण

Next
ठळक मुद्दे‘दे वाण-घे वाण’ झालीच पाहिजे

संक्रांतीच्या निमित्ताने गृहिणींना घराबाहेर पडण्याची संधी मिळते. एरवी वर्षभर संसारात गुरफटून राहणाऱ्या महिलांना त्यांचे विचार प्रकट करता येतात. यातून अनेक महिलांचा घरात होणारा कोंडमारा दूर होतो. महिला संक्रांतीचे वाण देतात आणि घेतात. हे केवळ एक धार्मिक परंपरा म्हणूनच नाही तर या दे वाण, घे वाण मधून तयार होणारा जिव्हाळा, आपुलकी माणसाच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडवून आणतात, आणि हेच या सणाचे यश आहे.
संक्रातीच्या निमित्ताने महिला भेटतात, त्यांचे मन मोकळे करतात, विचारांची देवाणघेवाण होते, त्यामुळे महिलांचे मन हलके होण्यासोबतच त्यांच्यावरील ताणतणाव कमी होण्यास मदत होते.
महिलांच्या प्रगतीच्या वाटा अधिक सशक्त करणाऱ्या या सणाचा आपण सन्मान केला पाहीजे. आजकाल बहुतांश महिला नोकरी करतात. नोकरी, संसार सांभाळताना त्यांना स्वत:साठी वेळ देणे शक्य होत नाही. त्यातून त्यांचे सुख-दु:ख एकमेकींना कळत नाही. शेजारी राहूनही अनेक महिलांमध्ये दुरावाच असतो. पण संक्रांतीच्या सणानिमित्ताने महिलांच्या गाठीभेटी होतात. आरोग्यासाठी तीळ चांगले आहेत. त्याने रक्ताचे प्रमाण वाढते. शरीराला उष्णता मिळते. हाडाचे दुखणे दूर होते. घरात आरोग्यवर्धक वातावरण राहते. त्यामुळेच तीळगुळासह संक्रांतीच्या सणातील आनंद प्रत्येक घरात साजरा झाला पाहीजे.

Web Title: The festivities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.