शेतकऱ्यांच्या डाेक्याला ई-पीक पाहणीचा ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:37 AM2021-09-11T04:37:56+5:302021-09-11T04:37:56+5:30

शेतकऱ्यांस शेतात जाऊन आपल्या शेतातील पिकाची माहिती या ॲपमध्ये योग्यरित्या अचूकपणे भरायची आहे. या माहितीसह पिकाचा फोटो काढून या ...

Fever of e-crop inspection for farmers | शेतकऱ्यांच्या डाेक्याला ई-पीक पाहणीचा ताप

शेतकऱ्यांच्या डाेक्याला ई-पीक पाहणीचा ताप

Next

शेतकऱ्यांस शेतात जाऊन आपल्या शेतातील पिकाची माहिती या ॲपमध्ये योग्यरित्या अचूकपणे भरायची आहे. या माहितीसह पिकाचा फोटो काढून या ॲपवर टाकायचा आहे. या वर्षापासून तलाठी कार्यालयामार्फत शेतातील या पीक पेऱ्याची माहिती भरली जाणार नाही. शेतकऱ्याने ऑनलाईन भरलेली माहितीच ग्राह्य धरली जाणार आहे. परंतु, यासाठी शेतकरी ऑनलाईन साक्षर होणे आवश्यक आहे. त्यास यासाठी खास प्रशिक्षण देण्याची व्यवस्था अपेक्षित आहे. शेतकऱ्यांना प्रशिक्षण न मिळाल्यामुळे माहिती भरण्यापासून ते अनभिज्ञ असल्याचे दिसून येते आहे.

बाॅक्स

३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

ई-पीक पाहणी अहवाल भरण्यासाठी यापूर्वी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली हाेती. मात्र ही पद्धत नवीन आहे. अनेक शेतकऱ्यांना याबाबत काहीच माहिती नाही. त्यामुळे राज्यभरातील फार कमी शेतकऱ्यांनी माहिती भरली आहे. त्यामुळे माहिती भरण्यास ३० सप्टेंंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

बाॅक्स

असा भरावा ई पीक पाहणी अहवाल...

स्टेप १- खाते क्रमांक निवडायचा आहे. स्टेप २. भूमापन /गट क्रमांक निवडायचा आहे. त्यानंतर त्या गटाचे क्षेत्र उपलब्ध होईल. स्टेप ३ - सुरू असलेला खरीप हंगाम निवडा. त्यानंतर पीक पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र दाखवेल. स्टेप ४- निर्भेळ पीक (एक पीक) निवडा. स्टेप ५ - निर्भेळ पिकाचा प्रकार निवडा. स्टेप ६. पिकांची / झाडांची नावे. स्टेप ७ - क्षेत्र भरा ( हे.आर.) यामध्ये भात पिकाचे क्षेत्र भरा. स्टेप ८ - जलसिंचनाचे साधन असेल तर साधन निवडा अन्यथा शेवटी दिलेला अजल सिंचित (जिरायत) पर्याय निवडा. स्टेप ९ - साधन असल्यास प्रवाही सिंचन किंवा अन्य प्रकारे निवडा. स्टेप १० - रोवणी केलेली तारीख निवडा. स्टेप ११ - शेतावर जाऊन पिकाचे फोटो काढून माहिती submit करा. सबमिट करण्यापूर्वी माहिती अचूक असल्याची खात्री करा.

Web Title: Fever of e-crop inspection for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.