सर्वेक्षण व पंचनाम्यासाठी यंत्रणा शेतावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:25 AM2017-10-27T00:25:38+5:302017-10-27T00:25:50+5:30
परतीच्या पावसाने धान पिकाच्या केलेल्या नुकसान व विविध रोगांच्या आक्रमणाने खचणाºया शेतकºयांना धीर देण्यासाठी आता सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : परतीच्या पावसाने धान पिकाच्या केलेल्या नुकसान व विविध रोगांच्या आक्रमणाने खचणाºया शेतकºयांना धीर देण्यासाठी आता सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. जिल्हाधिकारी तसेच संबंधित यंत्रणेकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे शासकीय यंत्रणा शेतात पोहोचली असून नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण सुरु झाले आहे. यामुळे शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे.
तालुक्यात परतीच्या पावसाने हलक्या धानाची नासधूस केली तर उभ्या असलेल्या धानपिकावर विविध रोगांनी आक्रमण केले असुन शेतकºयांनी शर्थीचे प्रयत्न केल्यावरही धानपीक पूर्णत: नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी कुटुंबाच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आले आहे. शेतकरी कुटुंबाने धिर सोडू नये, असे आवाहन आ.कृष्णा गजबे यांनी केले.
जुनी वडसा येथील प्रभाकर मुळे यांच्या धानपीकाची पाहणी केली. तालुक्यात जुनी वडसा, कुरूड, कोंढाळा परिसरात धान पिकावर तुडतुडा या रोगाने थैमान मांडले आहे. असंख्य शेतकºयांच्या शेतातील संपूर्ण धानपीक नष्ट झाले आहे. यामुळे आ. गजबे यांच्या आदेशाने जिल्हा, तालुक्यातस्तरीय कृषी विभाग, महसूल विभागातील सर्व यंत्रणा कामाला लागली आहे.
शेतातील धानपीकाची पाहणी करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन भेटी देऊन पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल शासनाकडे पाठवा, अशा सूचना कृषी अधिकारी, व महसूल विभाग यांना केल्या असून शेतकºयांना आर्थिक मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन मदत मिळवून देण्याची ग्वाही गजबे यांनी दिली.
देसाईगंज तालुक्यातील जुनी वडसा, कुरूड, कोंढाळा येथे भेटी देऊन धानपीकाची पाहणी केली. याप्रसंगी जि.प.सदस्य रोशनी पारधी, सचिन खरकाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, तालुका कृषी अधिकारी धेंडे, उपविभागीय कृषी अधिकारी सोनटक्के, बोथीकर, ग्रा.पं. सदस्य मंगला शेंन्डे व ग्रामस्थ उपस्थित होते. नुकसानग्रस्त धानपिकाचे सर्वेक्षण महसूल व कृषी विभागामार्फत सुरू झाल्यामुळे शेतकºयांना मदत मिळण्याची शक्यता आहे.