सेवाज्येष्ठतेत मराठीच्याच शिक्षकांचा भरणा

By admin | Published: July 29, 2014 11:49 PM2014-07-29T23:49:43+5:302014-07-29T23:49:43+5:30

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नुकतीच सेवाज्येष्ठता यादी जाहीर केली असून या यादीमध्ये मराठी व सामाजिकशास्त्र विषयामध्ये पदवीधर व बीएड् झालेल्या शिक्षकांचाच भरणा आहे.

In the field of seniority, the recruitment of Marathi teachers | सेवाज्येष्ठतेत मराठीच्याच शिक्षकांचा भरणा

सेवाज्येष्ठतेत मराठीच्याच शिक्षकांचा भरणा

Next

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नुकतीच सेवाज्येष्ठता यादी जाहीर केली असून या यादीमध्ये मराठी व सामाजिकशास्त्र विषयामध्ये पदवीधर व बीएड् झालेल्या शिक्षकांचाच भरणा आहे. त्यामुळे हे शिक्षक इंग्रजी, गणित व विज्ञान हे विषय शिकविणार कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पदवीधर शिक्षकांची नेमणूक करण्यासाठी शिक्षण विभागाने पदोन्नतीस योग्य व पात्र अशा शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी जाहीर केली आहे. यामध्ये जवळपास ९५ टक्के शिक्षक मराठी व इतिहास, भुगोल, अर्थशास्त्र या विषयांमध्ये पदवीधर आहेत. त्याचबरोबर बीएड्चे शिकविण्याचे विषयसुध्दा तेच आहेत. प्रत्येकच शाळेला सामाजिकशास्त्रांबरोबरच इंग्रजी, गणित व विज्ञान शिकविणाऱ्या शिक्षकांचीही आवश्यकता राहते. उलट हे विषय कठीण असल्याने या विषयाच्या शिक्षकांची नियुक्ती करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र सेवाज्येष्ठता यादीमध्ये या शिक्षकांचे प्रमाण अत्यंत नगन्य आहेत. सामाजिकशास्त्रात शिक्षण घेतलेले शिक्षक विज्ञान, इंग्रजी, गणित हे विषय शिकवूच शकत नाही. केवळ याच विषयांमुळे विद्यार्थ्यांचा ओढा कॉन्व्हेंटकडे वाढला आहे. या शिक्षकांची नियुक्ती न केल्यास शिक्षणाचा दर्जाही घसरण्याची शक्यता आहे. परिणामी हे विषय शिकविण्यासाठी बीएड्धारक शिक्षक मिळत नसल्यास किमान एखादा शिक्षक पदवीधर असेल अशाचीही नियुक्ती करावी, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे.

Web Title: In the field of seniority, the recruitment of Marathi teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.