क्षेत्र कर्मचारी उपाेषणावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:26 AM2021-06-25T04:26:13+5:302021-06-25T04:26:13+5:30
गडचिराेली : १५ जून राेजी हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना कीटकनाशक फवारणीचे आदेश देण्यात आले हाेते. हे आदेश पूर्ववत करून त्यांना ...
गडचिराेली : १५ जून राेजी हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना कीटकनाशक फवारणीचे आदेश देण्यात आले हाेते. हे आदेश पूर्ववत करून त्यांना कामावर घ्यावे, या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांनी २४ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर साखळी उपाेषणाला सुरुवात केली आहे.
बाहेर जिल्ह्यातील हंगामी क्षेत्र कर्मचारी यांना गडचिराेली जिल्ह्यात काम देऊ नये. जिल्ह्यातीलच २०१५-१६ मध्ये नियुक्त झालेल्या हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना कामे द्यावी. २०१५-१६ मध्ये नियुक्त झालेल्या हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांची यादी समाविष्ट करावी. जुन्या तसेच नवीन हंगामी क्षेत्र कर्मचारी यांना आळीपाळीने आदेश देण्यात यावे. सर्व हंगामी क्षेत्र कर्मचारी यांची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करावी आदी मागण्यांसाठी हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांनी २४ जूनपासून साखळी उपाेषणाला सुरुवात केली आहे.
साखळी उपाेषणात घनश्याम भांडेकर, गितेश खेवले, रजत राऊत, अमाेल ठाकरे, दिगांबर भाेयर, स्वप्नील म्हशाखेत्री, मयूर म्हशाखेत्री आदींनी सहभाग घेतला.