पावणेतीन लाख नागरिक अद्याप लसीकरणापासून दूरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 05:00 AM2021-10-18T05:00:00+5:302021-10-18T05:00:38+5:30
आराेग्य विभागाकडे असलेल्या नाेंदीनुसार गडचिराेली जिल्ह्याची लाेकसंख्या ११ लाख ९१ हजार ८०१ एवढी आहे. सध्या १८ वर्षांपुढील नागरिकांना लस दिली जात आहे. गडचिराेली जिल्ह्यात १८ वर्षांपुढील ८ लाख ३७ हजार १०५ एवढी लाेकसंख्या आहे. काेराेनापासून मुक्तीचा लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण हाेईल, यासाठी प्रशासन व आराेग्य विभाग प्रयत्न करीत आहे. जानेवारी महिन्यापासून लसीकरणाला सुरुवात झाली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असले तरी लसीकरणासाठी पात्र असलेल्या एकूण लाेकसंख्येपैकी सुमारे २ लाख ८० हजार नागरिक अजूनही पहिल्या डाेसपासून दूरच असल्याचे दिसून येत आहे.
आराेग्य विभागाकडे असलेल्या नाेंदीनुसार गडचिराेली जिल्ह्याची लाेकसंख्या ११ लाख ९१ हजार ८०१ एवढी आहे. सध्या १८ वर्षांपुढील नागरिकांना लस दिली जात आहे. गडचिराेली जिल्ह्यात १८ वर्षांपुढील ८ लाख ३७ हजार १०५ एवढी लाेकसंख्या आहे. काेराेनापासून मुक्तीचा लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण हाेईल, यासाठी प्रशासन व आराेग्य विभाग प्रयत्न करीत आहे. जानेवारी महिन्यापासून लसीकरणाला सुरुवात झाली. आता जवळपास १० महिन्यांचा कालावधी उलटत चालला आहे. या १० महिन्यांच्या कालावधीत ५ लाख ५६ हजार ८८८ नागरिकांनी पहिला डाेस तर २ लाख ३४ हजार १२ नागरिकांनी दुसरा डाेस घेतला आहे. लवकरात लवकर १०० टक्के नागरिकांना लस उपलब्ध हाेईल, यासाठी आराेग्य विभाग प्रयत्नरत आहे.
कुरखेडा तालुक्यात लसीकरण
- पहिला व दुसरा डाेस घेण्यात कुरखेडा तालुक्यातील नागरिक आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. कुरखेडा तालुक्याची एकूण लाेकसंख्या ९५ हजार ४९५ एवढी आहे. त्यापैकी ६७ हजार ७४ नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत.
- त्यापैकी ६२ हजार ३०९ नागरिकांनी पहिला डाेस घेतला आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ९२.९० टक्के एवढे आहे. ३१ हजार ३६५ नागरिकांनी दुसरा डाेस घेतला आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ४६.७६ टक्के एवढे आहे.
२४ वाहनांमुळे गती वाढली
गावाेगावी जाऊन लस देण्यासाठी आराेग्य विभागाला सुमारे २४ वाहने उपलब्ध झाली आहेत. ही वाहने चालविण्यासाठी चालक भरतीसुद्धा केली जात आहे. वाहनांच्या मदतीने खेड्यापाड्यात पाेहाेचणे लसीकरण पथकाला शक्य हाेत असल्याने लसीकरणाची गती वाढली आहे.
नागरिकांच्या मनामध्ये लसीकरणाविषयी असलेली भीती कमी झाली आहे. त्यामुळे नागरिक स्वत:हून लस घेण्यास पुढे येत आहेत. नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व आराेग्य कर्मचारी, गावातील सुशिक्षित नागरिक पटवून देत आहेत.