पेपरमिलला आग लागण्याप्रकरणी व्यवस्थापकांवर गुन्हे दाखल करा
By admin | Published: March 15, 2017 01:58 AM2017-03-15T01:58:38+5:302017-03-15T01:58:38+5:30
पेपरमिलला आग लागण्यासाठी पेपरमिललचे जनरल मॅनेजर व पर्सनल मॅनेजर दुरनकर तसेच इतर वरिष्ठ अधिकारी जबाबदार असून
पोलीस स्टेशनमध्ये तक्रार : आग विझविण्यासाठी प्रयत्न केले नाही
आष्टी : पेपरमिलला आग लागण्यासाठी पेपरमिललचे जनरल मॅनेजर व पर्सनल मॅनेजर दुरनकर तसेच इतर वरिष्ठ अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावी, अशी तक्रार कामगारांनी आष्टी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याकडे केली आहे.
आष्टी पेपरमिलला १३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आग लागली. ही बाब आष्टी पेपरमिलच्या कर्मचाऱ्यांना माहित होताच कर्मचारी आग विझविण्यासाठी धावत गेले. मात्र कर्मचाऱ्यांना गेटवरच अडविण्यात आले. काही कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने घुसून आग विझविण्याचा प्रयत्न केला. पेपरमिलमध्ये पाण्याची सुविधासुद्धा उपलब्ध नव्हती. अग्निशमन दल यंत्रणा सुद्धा बंद होती. आग आटोक्यात येण्यासाठी अधिकाऱ्यांनी कोणतेही प्रयत्न केले नाही. आग विझविण्याचे काही साहित्य असतानाही त्याचा वापर करण्यात आला नाही. त्यामुळे आग लावण्यामध्ये पेपरमिलचे जनरल मॅनेजर, पर्सनल मॅनेजर व मॅनेजमेंट यांचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी संघटनेचे महासचिव अनंत प्रधान, कार्याध्यक्ष राजनाथ कुशवाह, उपाध्यक्ष विनायक जंगमवार, गजानन किरनापुरे, व्यंकटेश तोगरवार, मंगलमूर्ती निनावे, मोहन जोगरवार, अमित चक्रवर्ती, प्रमोद करमकर, युवराज तिडके, विठ्ठल आवारी यांनी सहिनिशी दिलेल्या तक्रार म्हटले आहे. तक्रार देतेवेळी आ. डॉ. देवराव होळी, माजी जि. प. अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)