वाकडी येथील दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:26 AM2021-05-31T04:26:43+5:302021-05-31T04:26:43+5:30

तालुक्यातील वाकडी येथे १० वर्षांपासून अवैध दारू विक्री बंद होती. मात्र, निवडणुकीच्या काळात दारूची मागणी राहत असल्याने झटपट पैसे ...

Filed a case against a liquor dealer at Wakdi | वाकडी येथील दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल

वाकडी येथील दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल

Next

तालुक्यातील वाकडी येथे १० वर्षांपासून अवैध दारू विक्री बंद होती. मात्र, निवडणुकीच्या काळात दारूची मागणी राहत असल्याने झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशाने गावातील ५ जणांनी अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे गावात मुक्तिपथ अभियानाच्या माध्यमातून गाव संघटना पुनर्गठित करून अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी नियोजन करण्यात आले. त्यानुसार गावातील अवैध दारू विक्रेत्यांना गावात अवैध दारू विक्री न करण्याचे गाव संघटनेच्या माध्यमातून ठणकावून सांगण्यात आले. तरीसुद्धा गावात अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती गाव संघटनेच्या महिलांना मिळाली. त्यानुसार युवक व महिलांनी अहिंसक कृती करीत जंगल परिसरात शोधमोहीम राबविली असता आनंदराव मेश्राम या इसमाने आपल्याकडील ४० देशी दारूच्या निपा घटनास्थळावर सोडून जंगलाच्या दिशेने पळून गेला.

Web Title: Filed a case against a liquor dealer at Wakdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.