ओलाला इंडस्ट्रीजच्या संचालकावर गुन्हा दाखल

By admin | Published: May 14, 2016 01:22 AM2016-05-14T01:22:31+5:302016-05-14T01:22:31+5:30

अन्न व औषध प्रशासन विभागाने ५ मे रोजी ओलाला इंडस्ट्रीजमधील पाण्याचे पाकीट तपासले असता, त्यांच्यावरील पॅकिंग तारीख नसल्याचे दिसून आले होते.

Filed a complaint against the owner of Olala Industries | ओलाला इंडस्ट्रीजच्या संचालकावर गुन्हा दाखल

ओलाला इंडस्ट्रीजच्या संचालकावर गुन्हा दाखल

Next

गडचिरोली : अन्न व औषध प्रशासन विभागाने ५ मे रोजी ओलाला इंडस्ट्रीजमधील पाण्याचे पाकीट तपासले असता, त्यांच्यावरील पॅकिंग तारीख नसल्याचे दिसून आले होते. या प्रकरणी १० मे रोजी ओलाला इंडस्ट्रीजचे संचालक रमाकांत सत्यनारायण ओल्लालवार व श्रीकांत ओल्लालवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त एम. एस. केंबळकर यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. देसाईगंज शहरातही तारखेविनाच पाण्याचे पाकीट विकले जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला प्राप्त झाली. त्यानुसार ११ मे रोजी फवारा चौकातील रमेश कोल्ड्रींक अँड लक्ष्मी लॉज व श्री अंबे बिकानेर या दुकानांवर धाड टाकली. रमेश कोल्ड्रींक अँड लक्ष्मी लॉज या दुकानातून ६०० रूपये किमतीचे २०० पाणी पाऊच तर श्री अंबे बिकानेर या दुकानातून ५७० रूपये किमतीचे १९० पाणी पॉकेट जप्त करण्यात आले. संबंधित दुकानदारांवरही कारवाई केली जाणार आहे, असे केंबळकर म्हणाले.

Web Title: Filed a complaint against the owner of Olala Industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.