लगामच्या ३३ केव्ही उपकेंद्रासाठी दिलेल्या जमिनीचे १४ लाख भरा

By admin | Published: September 23, 2016 01:37 AM2016-09-23T01:37:36+5:302016-09-23T01:37:36+5:30

तालुक्यातील लगाम येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रासाठी मंजूर केलेल्या जमिनीचे भोगाधिकार

Fill up to 14 lakhs of land given for the Kadam 33 KV sub station | लगामच्या ३३ केव्ही उपकेंद्रासाठी दिलेल्या जमिनीचे १४ लाख भरा

लगामच्या ३३ केव्ही उपकेंद्रासाठी दिलेल्या जमिनीचे १४ लाख भरा

Next

लेखापरीक्षणात आक्षेप : तहसीलदारांचे महावितरण कंपनीला पत्र
मुलचेरा : तालुक्यातील लगाम येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रासाठी मंजूर केलेल्या जमिनीचे भोगाधिकार मुल्य कमी आकारल्याचा महालेखापाल यांनी लेखा परिक्षणादरम्यान ठपका ठेवल्याने १४ लाख ३८ हजार २०० रूपये एवढी रक्कम सरकार जमा करण्याचे पत्र वीज वितरण कंपनीला दिले आहे.
लगाम येथे ३३ केव्ही उपकेंद्र मागील अनेक वर्षांपासून मंजूर होते. तथापी जागेअभावी त्याचे बांधकाम रखडले होते. मात्र जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी ७ मार्च २०१५ ला लगामचेक येथील कांचनपूर मार्गावरील सर्वे नंबर १२७ व १२८ मधील जागा उपलब्ध करून दिली. त्या मोबदल्यात वीज वितरण कंपनीने केवळ ६६ हजार रूपये सरकारजमा केले होते. नागपूरचे लेखापाल यांनी ४ ते ११ जुलै २०१६ पर्यंत महसूल जागेचे निरिक्षण करून लगामच्या ३३ केव्ही उपकेंद्रास दिलेल्या जमिनीचा भोगाधिकार मुल्य कमी वसूल केल्याचा ठपका ठेवून १४ लाख ३८ हजार २०० रूपये तत्काळ सरकारजमा करण्याचे पत्र बल्लारपूरच्या कार्यकारी अभियंता (वीज वितरण कंपनी) यांना तहसीलदारामार्फत पाठविले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Fill up to 14 lakhs of land given for the Kadam 33 KV sub station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.