कौशल्याधिष्टित अभ्यासक्रमावर भर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:25 AM2017-09-13T00:25:11+5:302017-09-13T00:25:11+5:30
शिक्षण प्रणालीत रोजगार मिळण्याची हमखास संधी राहिली नाही. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : शिक्षण प्रणालीत रोजगार मिळण्याची हमखास संधी राहिली नाही. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत जात आहेत. विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे अभ्यासक्रम महाविद्यालयांनी निवडावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. एन.व्ही. कल्याणकर यांनी केले.
स्थानिक आदर्श कला वाणिज्य महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी संस्थाध्यक्ष डॉ. निर्मलसिंग टुटेजा यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष जगदीश शर्मा होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. एन.एस. कोकोडे, सहसचिव सुनील नाकतोडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष केवळराम घोरमोडे, पी.एच. बाळबुद्धे, प्रकाश भैय्या, प्राचार्य एच.एम. कामडी, सोपाल अग्रवाल, डॉ. इंद्रजीत टुटेजा, नानक कुकरेजा, हरिदास कसारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. संचालन श्रीराम गहाणे तर आभार धोटे यांनी मानले.