रुग्णालयांमधील रिक्त पदे भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 10:46 PM2017-11-28T22:46:40+5:302017-11-28T22:47:49+5:30
जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. सदर पदे भरण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आली असून याबाबतचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांना देण्यात आले.
जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये वर्ग ३ ची १६९ पदे, वर्ग ४ ची १०७ पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर वर्ग १ च्या डॉक्टरचे ३० पदे मंजूर असून केवळ ९ पदे भरण्यात आली आहेत. सुमारे २१ पदे रिक्त आहेत. महिला व बाल रुग्णालयात १७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी एक पद भरण्यात आली असून सुमारे ४४ पदे रिक्त आहेत. डॉक्टर व कर्मचाºयांच्या रिक्तपदांमुळे आरोग्यसेवा मिळण्यास अडचण जात आहे. ही बाब जिल्हा शल्य चिकित्सकांच्या लक्षात आणून दिली. एक महिन्याअगोदर सिजरिनचे आॅपरेशन करण्यात आले. मात्र टाके व्यवस्थित बांधण्यात आले नाही. त्यामुळे सदर महिलेवर दुसºयांदा टाके मारावे लागले. काही रुग्णांवर एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटूनही उपचार केले जात नाही. अतिरिक्त भारामुळे कामाचा बोजा वाढला आहे. परिणामी रुग्णांची हेळसांड होत आहे. रुग्णालयातील सीटीस्कॅन बंद असल्याने खासगी रुग्णालयात सीटीस्कॅनसाठी पाठविली जात आहे. सीटीस्कॅनचा खर्च रुग्णालयाने उचलावा, अशी मागणी केली. रुग्णसेवा सुरळीत न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
निवेदन देतेवेळी माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, नगरसेवक सतीश विधाते, युवक काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महासचिव प्रभाकर वासेकर, तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, पांडुरंग घोटेकर, जिल्हा सचिव पी.टी. मसराम, एजाज शेख, देवाजी सोनटक्के, बाळू मडावी, कमलेश खोब्रागडे, कुणाल पेंदोरकर, लहुकुमार रामटेके, रामचंद्र गोटा, जितू मुनघाटे, राकेश रत्नावार, प्रतीक बारसिंगे, पंडित पुडके, प्रकाश अंबाडकर उपस्थित होते.