अखेर कोरोनाबाधित क्षेत्रात फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 05:00 AM2020-06-01T05:00:00+5:302020-06-01T05:00:54+5:30
२७ मे रोजीच्या रात्री शहरातील दोन संशयीत रूग्णांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेत खळबळ माजली. रूग्ण राहत असलेल्या येथील आंबेडकर वॉर्डाला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले. सदर प्रतिबंधित क्षेत्रात इतर लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी जंतनाशक फवारणी करून हा परिसर निर्जंतूक केल्या जातो.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : धानोरा शहरातील दोन रूग्णांचे नमुना कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शहरात दहशत निर्माण झाली आहे. याबाबीला तीन दिवसांचा कालावधी उलटूनही स्थानिक नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने रूग्ण निवासी असलेल्या आंबेडकर वॉर्डात २०० मीटरच्या आत जंतनाशक फवारणी करण्यात आली नव्हती. दरम्यान ही बाब लोकमतच्या प्रतिनिधीने लक्षात आणून दिल्यानंतर नगर पंचायतीच्या वतीने कोरोनाबाधित क्षेत्रात सायंकाळी उशिरा जंतनाशक फवारणी करण्यात आली.
२७ मे रोजीच्या रात्री शहरातील दोन संशयीत रूग्णांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेत खळबळ माजली. रूग्ण राहत असलेल्या येथील आंबेडकर वॉर्डाला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले. सदर प्रतिबंधित क्षेत्रात इतर लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी जंतनाशक फवारणी करून हा परिसर निर्जंतूक केल्या जातो. ही जबाबदारी स्थानिक नगर पंचायत प्रशासनाकडे तहसीलदारांच्या आदेशान्वये सोपविण्यात आली. शहरातील दोन रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने रूग्णांचे घर व घराला लागून असलेल्या दुकानांत जंतनाशक फवाणी करण्यात आली. दुसऱ्या दिवशी येथील नगराध्यक्ष व उपाध्यक्षांच्या घरापर्यंत फवारणी करण्यात आली. वेळ झाल्याचे कारण सांगून फवारणीची चमू परतली. दुसºया दिवशी आंबेडकर वॉर्डात फवारणी करण्यात येईल, असे चमूच्या वतीने सांगण्यात आले. मात्र तीन दिवस उलटूनही फवारणी करणारी कामगारांची चमू आंबेडकर वॉर्डात फिरकली नव्हती. दरम्यान लोकमतच्या प्रतिनिधीसह सुज्ञ नागरिकांनी नगर पंचायत मुख्याधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर मुख्याधिकाºयांनी ४.३० वाजतानंतर फवारणीसाठी चमू पाठविली.
पाच लाखांचा निधी प्राप्त मात्र उपाययोजना तोकड्याच
धानोरा शहरात व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, याची खबरदारी महसूल व नगर पंचायत प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी धानोरा नगर पंचायत प्रशासनाला पाच लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने अद्यापही सॅनिटायझर तसेच मास्कचे वितरण सर्वसामान्य नागरिकांना करण्यात आले नाही.
धानोरा शहराच्या आंबेडकर वॉर्डात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्यानंतर संबंधित रूग्णाचे घर व लगतच्या दुकानात जंतनाशक फवारणी करण्यात आली मात्र उर्वरित आंबेडकर वॉर्डात २०० मीटरच्या आतील भागात जंतनाशक फवारणी करण्यात आली नव्हती. कोरोना संसर्गाच्याबाबत गडचिरोली जिल्हा १५ दिवसांपूर्वी ग्रीन झोनमध्ये होता. मात्र त्यानंतर रूग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने हा जिल्हा आॅरेंज झोनमध्ये गेला. कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी नगर पंचायतीने पुढाकार घेण्याची गरज आहे. रविवारी सायंकाळी उशिरा आंबेडकर वॉर्डात फवारणी करण्यात आली.