अखेर ‘त्या’ गाेदामांचा वीजपुरवठा पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2022 05:00 AM2022-06-15T05:00:00+5:302022-06-15T05:00:14+5:30

फेब्रुवारी २०२२ चे सदर तीनही मीटरचे एकूण वीज बिल ७ हजार ४० रुपये हाेते. सदर बिलाचा भरणा करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने ७ हजार ४० रुपये इतक्या रकमेचा धनादेश महावितरणच्या कार्यालयाला दिला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी हा चेक बॅंकेत जाऊन २३ मार्चला वटविला. मात्र, सदर तीन गाेदामांच्या वीज बिलांचा भरणा न करता पाेटेगाव मार्गावरील निवडणूक विभागाच्या वापरात असलेल्या एकाच गाेदामाचे वीज बिल भरण्यात आला.

Finally, the power supply of 'those' gadams is restored | अखेर ‘त्या’ गाेदामांचा वीजपुरवठा पूर्ववत

अखेर ‘त्या’ गाेदामांचा वीजपुरवठा पूर्ववत

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : दाेन ते तीन महिन्यांचे वीज बिल थकल्यानंतर ‘महावितरण’चे कर्मचारी संबंधित इमारतीच्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणचा वीजपुरवठा खंडित करतात. मात्र, वीज बिलाचा भरणा करण्यासाठी महसूल विभागाने दिलेला धनादेश वटविण्यात आला. त्यानंतरसुद्धा महावितरणच्या वतीने महसूल विभागाच्या शासकीय धान गाेदामाच्या तीन मीटरचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. जवळपास एक महिना वीजपुरवठा खंडित हाेता. दरम्यान, महसूल विभागाच्या अन्न व पुरवठा निरीक्षकांनी कानउघाडणी करताच सदर गाेदामाचा वीजपुरवठा नुकताच पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. 
गडचिराेली येथील तहसील कार्यालयाअंतर्गत एकूण चार शासकीय गाेदामे आहेत. त्यापैकी तीन गाेदाम अन्न व पुरवठा विभागातर्फे शासकीय धान गाेदाम म्हणून वापर केला जात आहे. या सर्व गाेदामांची देखरेख तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडून केली जाते. दरम्यान, फेब्रुवारी २०२२ चे सदर तीनही मीटरचे एकूण वीज बिल ७ हजार ४० रुपये हाेते. सदर बिलाचा भरणा करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने ७ हजार ४० रुपये इतक्या रकमेचा धनादेश महावितरणच्या कार्यालयाला दिला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी हा चेक बॅंकेत जाऊन २३ मार्चला वटविला. मात्र, सदर तीन गाेदामांच्या वीज बिलांचा भरणा न करता पाेटेगाव मार्गावरील निवडणूक विभागाच्या वापरात असलेल्या एकाच गाेदामाचे वीज बिल भरण्यात आला. महावितरणच्या या चुकीमुळे पंचायत समितीनजीकच्या तीनही शासकीय गाेदामातील कामगारांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला, प्रसंगी अंधाराचा सामना करावा लागला. या समस्येच्या अनुषंगाने तहसीलदार व पुरवठा निरीक्षकांनी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवून हा घाेळ दुरूस्त करण्याची मागणी केली. पुरवठा निरीक्षक बारदेवाड यांनी कार्यालय गाठून कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. 

मानवाधिकार कायद्याच्या धाकाने महावितरण नरमले

-    फेब्रुवारी महिन्याचा वीज बिलाचा भरणा करण्यासाठी मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात महावितरणला धनादेश देण्यात आला. मात्र महावितरण कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे भलत्याच मीटरचे वीज बिलाचे पैसे ‘त्या’ धनादेशातून वसूल करण्यात आले. मात्र भलत्याच मीटरचे बिल भरले.

-    महसूल विभागाने धनादेशासाेबत पत्र जाेडून ‘त्या’ तीन मीटरच्या वीज बिलाचा भरणा करावा, असा उल्लेख केला. असे असून सुद्धा महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी या तीन मीटरचे वीज बिल न भरता भलत्याच वीज बिलाचा भरणा केला. दरम्यान पुरवठा निरीक्षकांनी महावितरण कार्यालय गाठले. 

-    उकाड्यामुळे व अंधारामुळे गाेदामात कार्यरत कर्मचारी व कामगारांना काेणताही धाेका झाल्यास आपण मानवाधिकार कायद्याचा आधार घेऊन कारवाई करण्यास भाग पाडणार, अशी तंबी देताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्या तीन वीज मीटरचा वीज पुरवठा सुरू केला.

 

Web Title: Finally, the power supply of 'those' gadams is restored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.