रोवणी खर्चात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:36 AM2021-07-29T04:36:34+5:302021-07-29T04:36:34+5:30
पूर्वी धान रोवणीचे काम मजुरीने केल्या जात होते यात आठवडाप्रमाणे मजूर धान्य घेत असत त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात रोवणी ...
पूर्वी धान रोवणीचे काम मजुरीने केल्या जात होते यात आठवडाप्रमाणे मजूर धान्य घेत असत त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात रोवणी काम करताना सोयीचे होत होते. मात्र गेल्या सात आठ वर्षांपासून ही पद्धत बंद होऊन याऐवजी ठेका पद्धतीने रोवणी काम करण्याकडे मजुरांचा कल वाढला आहे. दरवर्षी रोवणी कामासाठी लागणारा खर्च वाढत चालला आहे. उत्पादित मालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेती व्यवसाय तोट्यात करावा लागत आहे. रोवणी, चिखलणी, नांगरणी आदींचा वाढता खर्च शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागत असला तरी शेतकरी हा व्यवसाय अनेक वर्षांपासून टिकवून ठेवत आहे. निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या या व्यवसायातून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधण्यास मोठी अडचण जात आहे.
रोवणी कामासाठी मजूर एकरी ४ हजार रुपये प्रमाणे मजूर ठेका धरून रोवणी करीत आहेत यासाठी महिला मजूर सुद्धा याकामी चारपैसे अधिक मिळतील या आशेने सकाळी ७ वाजतापासून शेतात रोवणी काम करताना दिसून येत आहे. साधारण १० महिला मजूर एका दिवशी २ एकर रोवणी काम करीत असल्याची माहिती मजुरांनी दिली.
(बॉक्स)
सकाळी ६ वाजताच शेतात
काही शेतकरी रोवणी कामाला मजूर मिळत नसल्याने सकाळ पाळीत रोवणी काम करताना दिसून येत आहेत यासाठी मजूर सकाळी ६ वाजता शेतात जाऊन ८.३० वाजेपर्यंत काम करीत असतात. यासाठी १०० रुपये प्रति मजूर द्यावा लागत आहे तर दिवसभरासाठी २५० रुपये मजुरी मजुरांना दिली जात आहे. मजुरीचा दर वाढूनही रोवणी कामासाठी मजूर तुटवडा भासत आहे त्यामुळे रोवणी काम योग्य वेळी करण्यास शेतकऱ्यांना अडचणीचे होत आहे.
280721\1652-img-20210728-wa0112.jpg
शेतकऱ्यांना रोवणी कामाचा आर्थिक फटका फोटो