शासकीय कामासोबत वित्तीय साक्षरता महत्त्वाची
By admin | Published: April 22, 2017 01:23 AM2017-04-22T01:23:28+5:302017-04-22T01:23:28+5:30
नागरी सेवा प्रदान करताना सेवा अधिकारी व कर्मचारी यांनी स्वत:च्या कुटुंबियांसाठी आर्थिक साक्षरता
जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नागरी सेवा दिन साजरा
गडचिरोली : नागरी सेवा प्रदान करताना सेवा अधिकारी व कर्मचारी यांनी स्वत:च्या कुटुंबियांसाठी आर्थिक साक्षरता व नियोजन करण्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी केले.
११ व्या नागरी सेवा दिनाचा कार्यक्रम शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडला. यावेळी वित्तीय साक्षरता विषयावर व्याख्यान घेण्यात आले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. बदलत्या काळानुसार नागरी सेवेसमोर नवी आव्हाने दिसून येताता. त्यानुसार आपण आपली सेवा आणि क्षमता अद्यावत करावी, असेही जिल्हाधिकारी नायक यावेळी म्हणाले. दरम्यान नागरी सेवा दिनाचा दिल्ली येथे होणारा मुख्य सोहळा वेबकास्टद्वारे सर्वांनी बघितला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सेवा पुरस्कार देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात आले. प्रास्ताविक जयंत पिंपळगावकर यांनी केले तर संचालन व आभार जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)
नैपुण्य मिळविणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव
सन २०१६-१७ या वर्षात क्रीडा क्षेत्रात विभागीय स्तरावर नैपुण्य प्राप्त करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा जिल्हाधिकारी नायक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये अहेरीतील तलाठी विनोद कावटी, लिपीक महेश इंदूरकर, महेंद्र वट्टी व गीता वरखडे यांचा समावेश आहे.