दुकानांवर ४५ हजार रुपयांचा दंड ठाेठावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:27 AM2021-05-29T04:27:30+5:302021-05-29T04:27:30+5:30
कोरोना महामारीमुळे राज्यात लाकडाऊन सुरू आहे. फक्त अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त इतर दुकाने ...
कोरोना महामारीमुळे राज्यात लाकडाऊन सुरू आहे. फक्त अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त इतर दुकाने सुरू असल्याचे आढळून आल्यास पहिल्या वेळेस पाच हजार रुपये व त्यानंतर सुरू असल्याचे आढळल्यास पंचवीस हजार रुपये दंडाची तरतूद आहे. धानोरा शहरात लाकडाऊनच्या नियमांची कडक अंमलबजावणी व्हावी, याकरिता नगर पंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. नरेंद्र बेंबरे यांनी कर निरीक्षक अनिकेत कथळकर यांच्या नेतृत्वात तीन पथके तयार केली आहेत. सकाळी सकाळी ८ ते रात्री ७.३० वाजेपर्यंत ही पथके शहरात लक्ष ठेवून राहतात.
२७ मे रोजी शहरात फिरून पाहणी केली असता, अत्यावश्यक सेवा वगळता सात दुकाने सुरू असल्याचे आढळून आले व २८ मे रोजी पाहणी केली असता, दोन दुकाने सुरू असल्याचे आढळले. त्यांच्यावर प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे एकूण नऊ दुकानदारांवर ४५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई पथकप्रमुख गुलाब ठाकरे, अक्षय उके, अश्विन पडोळे, उमेश नागपुरे, मुरलीधर बोगा, अरविंद गुरनुले यांनी पार पाडली.