विनामास्क फिरणाऱ्यांवर ५ लाख ३६ हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:39 AM2021-03-23T04:39:11+5:302021-03-23T04:39:11+5:30
काेराेनाच्या प्रसाराला ब्रेक लावण्यासाठी बाहेर फिरतेवेळी मास्कचा वापर करणे, साेशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, तसेच वेळाेवेळी सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक ...
काेराेनाच्या प्रसाराला ब्रेक लावण्यासाठी बाहेर फिरतेवेळी मास्कचा वापर करणे, साेशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, तसेच वेळाेवेळी सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. मात्र सुरुवातीच्या कालावधीत नागरिकांना मास्क उपलब्ध हाेत नव्हते. तसेच मास्क घालण्याची अनेकांना सवय नव्हती. त्यामुळे काही नागरिक मास्क किंवा ताेंडावर रूमाल न बांधताच शहरात फिरत हाेते. अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हाेते. त्यानुसार नगर परिषदेने पथके तयार करून मास्क न घालताच शहरात फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली. वर्षभरात ५ लाख ३६ हजार १०६ रुपयांचा दंड वसूल केला आहे.
बाॅक्स ..
एप्रिल २०२० मध्ये सर्वाधिक दंड
मार्च महिन्यापासून शासनाने लाॅकडाऊन जाहीर केले. मात्र अनेकांना मास्क लावण्याची सवय नसल्याने ते मास्क न घालताच फिरत हाेते. अशा नागरिकांवर दंड आकारण्यात येत हाेता. एप्रिल २०२० मध्ये ८३० जणांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख ३९ हजार ९३० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
बाॅक्स .......
महिनानिहाय वसूल दंड
महिना कारवाई संख्या वसूल रक्कम
मार्च २०२० ३३० ४,१००
एप्रिल २०२० ८३० १,३९,९३०
मे २०२० ५४० ७७,१९१
जून २०२० ४६० ६०,२५०
जुलै २०२० ३५० ४६,६५०
ऑगस्ट २०२० १८० २३,०००
सप्टेंबर २०२० ३०५ ५५,३७०
ऑक्टाेबर २०२० २१८ १८,१४५
नाेव्हेंबर २०२० १६ ५००
मार्च २०२१ ४६० १,१०,९७०
एकूण ३,६८९ ५,३६,१०६