तुमच्या वाहनावर हजाराेंचा दंड तर नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:39 AM2021-08-23T04:39:25+5:302021-08-23T04:39:25+5:30

गडचिराेली जिल्ह्यात सीसीटीव्ही कॅमेरे नसले तरी शहर वाहतूक शाखेकडे स्पीड माेजणारे यंत्र आहे. या यंत्राच्या सहाय्याने वाहनाची गती माेजली ...

A fine of thousands on your vehicle, isn't it? | तुमच्या वाहनावर हजाराेंचा दंड तर नाही ना?

तुमच्या वाहनावर हजाराेंचा दंड तर नाही ना?

Next

गडचिराेली जिल्ह्यात सीसीटीव्ही कॅमेरे नसले तरी शहर वाहतूक शाखेकडे स्पीड माेजणारे यंत्र आहे. या यंत्राच्या सहाय्याने वाहनाची गती माेजली जाते. नियमापेक्षा जास्त गती असल्यास संबंधित वाहनाचे ई-चलन केले जाते. तसेच गडचिराेली शहरातील अनेक चारचाकी वाहने नागपूर शहरात जातात. त्या ठिकाणी चाैकातील सीसीटीव्हीवरूनही कारवाई केली जाते. त्यामुळे शहरात वाहतूक पाेलीस दिसत नसला तरी वाहतुकीचा नियम ताेडता कामा नये.

बाॅक्स

कसे केले जाते ई-चलन

शहर वाहतूक शाखेकडे स्पीड माेजणारे यंत्र आहे. या यंत्रासाठी स्वतंत्र चारचाकी वाहन आहे. या वाहनात वाहनाची गती माेजणारे यंत्र ठेवले जाते. पाेलिसांचे हे वाहन रस्त्याच्या कडेला राहत असल्याने वाहनचालकाच्या लक्षात येत नाही. मात्र, गतीची नाेंद केली जाते. नियम ताेडणाऱ्या वाहनाच्या नावाने आपाेआप ई-चलन तयार हाेते. त्यामुळे वाहनधारकांनी माेकळ्या रस्त्यावरही गतीने वाहन चालविता येणार नाही.

बाॅक्स

ई-चलनाचे संदेश का मिळत नाही?

वाहन नोंदणीवेळी तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर याचे मेसेज येत असतात. मात्र, अनेकांचा नंबर बदलल्यामुळे हे मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. आरटीओ कार्यालयात जाऊन माेबाईल नंबर बदलून घेण्याची गरज आहे.

बाॅक्स

या वेबसाईटवर मिळेल माहिती

अनेकांना माहितीही नसेल की, त्यांच्या नावावर वाहतूक नियम मोडल्याचा दंड जमा आहे. त्यामुळे आता ही माहिती तुम्ही घरबसल्या मोबाईल इंटरनेटवरून मिळवू शकता. डिजिटल इंडियामुळे अनेक सरकारी कामे ऑनलाईन होत आहेत. त्यामुळे आरटीओबाबतच्या समस्या आणि तक्रारीचे निवारण करण्यासाठी आरटीओची अधिकृत वेबसाईट आहे. यामध्ये echallan.parivahan.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुमच्या वाहनावर किती दंड जमा आहे, हे तपासू शकता.

बाॅक्स

वाहनांवरील दंड

महिना दंड

जानेवारी

एप्रिल ४,२५,६००

मे ६,४०,९००

जून ५,९०,१००

जुलै ५,६६,०००

Web Title: A fine of thousands on your vehicle, isn't it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.