निमय ताेडल्याने तुमच्या वाहनावर हजाराेंचा दंड तर नाही ना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 05:00 AM2021-08-23T05:00:00+5:302021-08-23T05:00:34+5:30
गडचिराेली जिल्ह्यात सीसीटीव्ही कॅमेरे नसले तरी शहर वाहतूक शाखेकडे स्पीड माेजणारे यंत्र आहे. या यंत्राच्या सहाय्याने वाहनाची गती माेजली जाते. नियमापेक्षा जास्त गती असल्यास संबंधित वाहनाचे ई-चलन केले जाते. तसेच गडचिराेली शहरातील अनेक चारचाकी वाहने नागपूर शहरात जातात. त्या ठिकाणी चाैकातील सीसीटीव्हीवरूनही कारवाई केली जाते. त्यामुळे शहरात वाहतूक पाेलीस दिसत नसला तरी वाहतुकीचा नियम ताेडता कामा नये.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : वाहतूक पाेलिसांकडून ई - चलन करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे तुम्ही नियम ताेडले असाल, तर तुम्हाला माहीत नसतानाही तुमच्या वाहनाच्या नावाने ई-चलन केले जाते. मात्र, माेबाईल नंबर बदलल्याने चलनाचे संदेश येत नाहीत. त्यामुळे ई-चलनाचा भुर्दंड वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गडचिराेली जिल्ह्यात सीसीटीव्ही कॅमेरे नसले तरी शहर वाहतूक शाखेकडे स्पीड माेजणारे यंत्र आहे. या यंत्राच्या सहाय्याने वाहनाची गती माेजली जाते. नियमापेक्षा जास्त गती असल्यास संबंधित वाहनाचे ई-चलन केले जाते. तसेच गडचिराेली शहरातील अनेक चारचाकी वाहने नागपूर शहरात जातात. त्या ठिकाणी चाैकातील सीसीटीव्हीवरूनही कारवाई केली जाते. त्यामुळे शहरात वाहतूक पाेलीस दिसत नसला तरी वाहतुकीचा नियम ताेडता कामा नये.
नवीन परिवहन कायदा लागू झाल्यापासून दंडामध्ये माेठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. एखाद्या वाहनधारकाकडे कारवाई करतेवेळी पैसे नसतील तर त्याचे ई-चालन केले जाते. सदर वाहनधारक कधी पैसे भरू शकतात. त्यामुळे अनेक जण वेळेवर पैसे भरत नाही. एकाच वाहनावर तीन ते चार चालनचे पैसे उधार राहत असल्याचे प्रकार वाढले आहेत. याची वसुली सुध्दा पाेलीस विभागाने करण्याची गरज आहे.
कसे केले जाते ई-चलन
शहर वाहतूक शाखेकडे स्पीड माेजणारे यंत्र आहे. या यंत्रासाठी स्वतंत्र चारचाकी वाहन आहे. या वाहनात वाहनाची गती माेजणारे यंत्र ठेवले जाते. पाेलिसांचे हे वाहन रस्त्याच्या कडेला राहत असल्याने वाहनचालकाच्या लक्षात येत नाही. मात्र, गतीची नाेंद केली जाते. नियम ताेडणाऱ्या वाहनाच्या नावाने आपाेआप ई-चलन तयार हाेते. त्यामुळे वाहनधारकांनी माेकळ्या रस्त्यावरही गतीने वाहन चालविता येणार नाही.
ई-चलनाचे संदेश का मिळत नाही?
वाहन नोंदणीवेळी तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर याचे मेसेज येत असतात. मात्र, अनेकांचा नंबर बदलल्यामुळे हे मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. आरटीओ कार्यालयात जाऊन माेबाईल नंबर बदलून घेण्याची गरज आहे.
या वेबसाईटवर मिळेल माहिती
अनेकांना माहितीही नसेल की, त्यांच्या नावावर वाहतूक नियम मोडल्याचा दंड जमा आहे. त्यामुळे आता ही माहिती तुम्ही घरबसल्या मोबाईल इंटरनेटवरून मिळवू शकता. डिजिटल इंडियामुळे अनेक सरकारी कामे ऑनलाईन होत आहेत. त्यामुळे आरटीओबाबतच्या समस्या आणि तक्रारीचे निवारण करण्यासाठी आरटीओची अधिकृत वेबसाईट आहे. यामध्ये echallan.parivahan.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुमच्या वाहनावर किती दंड जमा आहे, हे तपासू शकता.