नियम माेडणाऱ्या दुकानदारांवर दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:37 AM2021-04-16T04:37:03+5:302021-04-16T04:37:03+5:30
कोरोना बाधितांचे वाढती संख्या लक्षात घेता राज्य शासनाने १५ दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर केला आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे आदेश सरकारकडून ...
कोरोना बाधितांचे वाढती संख्या लक्षात घेता राज्य शासनाने १५ दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर केला आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता सरकारने आवश्यक सेवा सुविधा सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. १५ एप्रिल रोजी धानोरा येथे शासनाच्या नियमाप्रमाणे आवश्यक सेवांची दुकान सुरू होती. बाकी दुकाने बंद होती. तहसीलदारांच्या नेतृत्वात संयुक्त चमूने येथील बाजारपेठेत फिरून किराणा, भाजीपाला, मेडिकल दुकानात जाऊन पाहणी केली. दुकानात सॅनिटायझर असणे आवश्यक आहे. दुकानासमाेर ग्राहकांना उभे राहण्याकरिता गाेल वर्तुळ करणे आवश्यक आहे. साेशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक हाेते. काही दुकानदारांनी या नियमांचे पालन केले नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले. त्यांच्याकडून २ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
यावेळी तहसीलदार सी. जी. पीतूलवार, संवर्ग विकास अधिकारी बंडू निमसरकार, नायब तहसीलदार दामोदर भगत, धनराज वाकुडकर, पोलीस उपनिरीक्षक तेजस्विनी देशमुख, पुरवठा निरीक्षक चंदू प्रधान, मंडळ अधिकारी दशरथ भांडेकर, विस्तार अधिकारी सुधीर आखाडे, के. एस. नायडू, संजय पराचे, गिरीधर शेडमाके, संदीप माडगे, रोशन थोरात, प्रकाश कृपाकर उपस्थित हाेते.
===Photopath===
150421\15gad_1_15042021_30.jpg
===Caption===
बाजारपेठेत फिरून पाहणी करताना विविध विभागाचे अधिकारी